पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेपाळच्या पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून चर्चा
पूरस्थितीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल मोदी यांनी केले सांत्वन
Posted On:
26 AUG 2026 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधूभगिनींसोबत एकजुटीने उभी आहे, असे मोदी यांनी सांगितले.
तसेच, भारत नेपाळला शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्यासाठी तयार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. बचाव आणि मदत कार्यासाठी भारतीय पथके नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.
समाज माध्यम X वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी संवाद साधला आणि नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल सांत्वन केले. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या भगिनी आणि बंधूंसोबत एकजुटीने उभी आहे.
भारत नेपाळला शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्यासाठी तयार आहे. बचाव आणि मदत कार्याच्या प्रयत्नांसाठी आमची पथके नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत.
@PM_nepal_
@ShahBalen
* * *
निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303565)
अभ्यागत कक्ष : 20