राष्ट्रपती कार्यालय
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
25 AUG 2026 10:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे:-
“ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र प्रसंगी, मी भारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व देशबांधवांना, विशेषतः मुस्लीम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते आणि सदिच्छा व्यक्त करते.
ईद-ए-मिलाद-उन-नबीचा सण हा पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणींचे स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचे अनुसरण करण्यास प्रेरित करते.
पैगंबर मुहम्मद यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत.”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303388)
अभ्यागत कक्ष : 13