गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिव्यांग पुरुष क्रिकेट संघाची घेतली भेट
देशासाठी गौरव मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आणि दृढनिश्चय देशातील युवकांना प्रेरणा देतो- अमित शाह
भारत-इंग्लंड पुरुष मिश्र दिव्यांग टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेला संघ भारतात परतला, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शाह यांच्याकडून शुभेच्छा.
Posted On:
23 AUG 2026 9:25PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे भारताच्या दिव्यांग पुरुष क्रिकेट संघाची भेट घेतली.
एक्सवरील एका संदेशात शाह म्हणाले की,
आज नवी दिल्ली इथे देशाच्या दिव्यांग पुरुष क्रिकेट संघाची भेट घेऊन आनंद झाला. भारत-इंग्लंड पुरुष मिश्र दिव्यांग टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका 2026 साठी इंग्लंडचा दौरा करून हा संघ भारतात परतला आहे.
देशासाठी गौरव मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आणि दृढनिश्चय भारतातील युवकांना प्रेरणा देतो. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
***
राधिका अघोर/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2302571)
अभ्यागत कक्ष : 80
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam