गृह मंत्रालय
लद्दाखमध्ये जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे पीठ स्थापन करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
20 AUG 2026 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने लद्दाख येथे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे पीठ स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी स्वागत केले आहे.
अमित शाह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे,''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने लद्दाख येथे जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे पीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लद्दाखमधल्या दुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या अधिकाराअंतर्गत उपलब्ध कायदेशीर सेवांचा लाभ घेण्यास लागणाऱ्या कालावधीत घट होईल आणि न्यायापर्यंत पोहोच सुलभ होईल. सरकार लद्दाखचा सर्वांगीण विकास आणि संवैधानिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.''
सुषमा काणे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2301711)
आगंतुक पटल : 8