दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल सहकार्य आणि भविष्यातील नेटवर्क तंत्रज्ञानाला बळकटी देण्यासाठी पुण्यात 7वी ‘ब्रिक्स माहिती व संचार तंत्रज्ञान कार्यगट बैठक’; भारताच्या अध्यक्षतेखालील ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ या संकल्पनेनुसार बैठक


कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), पुढील पिढीतील संचार तंत्रज्ञान, उद्योग 4.0, विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या (ईएमएफ) संपर्कामुळे होणारे परिणाम आणि डिजिटल परिसंस्थेच्या एकत्रीकरणावर चर्चा करण्यासाठी ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी आले एकत्र

प्रविष्टि तिथि: 17 AUG 2026 9:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2026

 

भारताच्या अध्यक्षतेखाली माहिती आणि तंत्रज्ञान (आयसीटी) क्षेत्रातील सहकार्यासाठी आयोजित 'ब्रिक्स ट्रॅक'च्या प्रत्यक्ष बैठकांना आज पुण्यात सुरुवात झाली. या अंतर्गत 'माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची 7 वी बैठक पार पडली.

बैठकीचे उद्घाटन करताना दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. भारताच्या अध्यक्षतेखालील आयसीटी ट्रॅकची संकल्पना - "लवचिक भविष्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तन" - तसेच या संकल्पनेच्या चार प्रमुख स्तंभांची त्यांनी रूपरेषा मांडली. यानंतर सहभागी सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी आपली प्रारंभिक मनोगते व्यक्त केली.

दिवसभरात ‘ब्रिक्स इन्स्टिट्यूट ऑफ फ्युचर नेटवर्क’च्या कौन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत नियुक्त राष्ट्रीय शाखांच्या उपक्रमांचा तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), पुढील पिढीतील संचार तंत्रज्ञान, उद्योग 4.0 मधील इंटरनेट ॲप्लिकेशन्स आणि विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या (ईएमएफ) संपर्कामुळे होणारे परिणाम या विषयांवरील अभ्यास गटांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर कार्यगटाने अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आलेल्या प्राधान्यक्रमांवर आणि सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या प्रतिसादांच्या संकलित निष्कर्षांवर चर्चा केली. तसेच सदस्य देशांनी सादर केलेल्या संकल्पना पत्रांवर विचारविनिमय करण्यात आला.

उद्या ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांवरील केंद्रित गटाची बैठक’ आणि ‘डिजिटल ब्रिक्स कृती दलाची बैठक’ पार पडणार आहे.

Follow DoT Handles for more: -

X - https://x.com/DoT_India

Insta-  https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2300677) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Kannada , Malayalam