दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
युपीआयच्या माध्यमातून पॉस ट्रान्सफरवर आधारित कतार-भारत ‘पोस्टल रेमिटन्स’ सेवा आता कतार पोस्टच्या आउटलेट्सवर उपलब्ध
नव्या ‘डिजिटल पोस्टल रेमिटन्स’ सेवेमुळे कतारमधून भारतात जलद, सुरक्षित आणि सुलभतेने पैसे पाठवण्याची व्यवस्था
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
‘यूपीआय’च्या माध्यमातून, पॉस ट्रान्सफर व्यवस्थेवर आधारित कतार- भारत ‘रेमिटन्स’ सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे, कतारमधील ग्राहकांना, कतारमधील ‘पोस्ट’ कार्यालयामधून, यूपीआय- आधारित बँक खात्यात कतारहून थेट भारतात पैसे पाठवता येणार आहेत.
ही सेवा, कतार पोस्ट, भारतीय टपाल विभाग, जागतिक टपाल संघटनेचे आंतर-जोडणी प्लॅटफॉर्म (यूपीयू-आयपी), आणि एनपीसीआय इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या सहकार्यातून सुरु करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत, 15 ऑगस्ट 2026 पासून ही सेवा कतारमध्ये उपलब्ध करून देण्यात आली. कतारमधील भारतीय दूतावासाचे प्रभारी राजदूत संदीप कुमार यांनी या निमित्ताने दोहा येथील लुलू मॉलमधील कतार पोस्टच्या आउटलेटला भेट देऊन संबंधित हितसंबंधीयांशी संवाद साधला. या उपक्रमामुळे भारत आणि कतारमधील डिजिटल आर्थिक संपर्क अधिक मजबूत होण्याबरोबरच द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

कतारमध्ये युपीआय द्वारे पैसे पाठवण्यासाठी ‘पॉस’ ट्रान्सफरची व्यवस्था

या सेवेंतर्गत, ग्राहक कतार पोस्टच्या आउटलेटवर जाऊन भारतातील लाभार्थ्याचा यूपीआय आयडी तसेच आवश्यक ग्राहक ओळख तपशील देऊन पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. भारतातील लाभार्थी वापरत असलेल्या युपीआय अॅपद्वारे परदेशातून येणारी रक्कम स्वीकारण्याची सुविधा सक्रिय करणे आवश्यक आहे. ही सुविधा सक्रिय केल्यानंतर पाठवलेली रक्कम लाभार्थ्याच्या युपीआय-आधारित बँक खात्यात तात्काळ जमा होईल.
युपीआय आधारित पॉस ट्रान्सफर सेवा, ही आंतरराष्ट्रीय सेवा असून, त्याद्वारे, भारतात पैसे पाठवण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच आंतरराष्ट्रीय टपाल संघटनेच्या आंतर-जोडणी प्लॅटफॉर्मला भारताच्या युपीआय व्यवस्थेशी जोडून, ही सुविधा देण्यात आली आहे. याद्वारे, संबंधित टपाल ऑपरेटर्सना त्यांच्या ग्राहकांना, भारतातील युपीआय-सक्षम बँक खात्यात, कतार मधून थेट पैसे पाठवणे शक्य होईल.
भारतीय टपाल विभाग इतर देशांतील टपाल सेवा प्रदात्यांसोबतही युपीआय-आधारित पॉस ट्रान्सफर सेवांचे अतिरिक्त मार्ग कार्यान्वित करण्यासाठीही काम करत आहे. यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार अधिक मजबूत आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300604)
आगंतुक पटल : 14