गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी फडकवला तिरंगा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्ती आणि अभिमानाची भावना होते बळकट

प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरी तिरंगा फडकावून आणि त्या क्षणाचा सेल्फी http://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करुन देशभक्तीचा उत्सव करावा साजरा

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2026 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026

‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी तिरंगा ध्वज फडकवला. देशातील प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी झालेल्या लाखो जणांसोबत एकत्र यावे, तसेच आपापल्या घरी तिरंगा फडकावून आणि त्या क्षणाचा सेल्फी http://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करुन देशभक्तीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले.

‘एक्स’ या समाज माध्‍यमावरील संदेशात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “आज, नवी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी मी #HarGharTiranga मोहिमेंतर्गत तिरंगा फडकवला. मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली ही मोहीम आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्ती आणि अभिमानाची भावना आणखी बळकट करत आहे. आज घडीला कोट्यवधी देशबांधव तिरंगा ध्वजाशी जोडले जात एक भारत, श्रेष्ठ भारत या भावनेला बळकटी देत आहेत.”

‘एक्स’ मंचावर पाठवलेल्या आणखी एका संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणतात, “तिरंगा ध्वज हे आपल्या देशाबद्दलच्या पवित्र अभिमानाचे आणि आपल्या ऐक्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. आपला राष्ट्रध्वज फडकावून #HarGharTiranga चळवळीत सहभागी झालो. या चळवळीत सहभागी झालेल्या लाखो जणांसोबत एकत्र येण्याचे तसेच आपापल्या घरी तिरंगा फडकावून आणि त्या क्षणाचा सेल्फी http://harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करुन देशभक्तीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन मी प्रत्येक नागरिकाला करतो.”


सुवर्णा बेडेकर/ संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2299160) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Odia , English , Urdu , हिन्दी , Gujarati , Kannada , Malayalam