पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक हत्ती दिन 2026 निमित्त विशाखापट्टणम येथे राष्ट्रीय सोहळा संपन्न; हत्ती संवर्धन आणि व्यवस्थापनातील अनुकरणीय योगदानाबद्दल गज गौरव पुरस्कार 2026 वितरित


भारताची हत्ती संवर्धनाप्रती असलेली वचनबद्धता ही केवळ एक धोरणात्मक निवड नसून ते नागरी मूल्ये आणि पर्यावरणीय जबाबदारीचे प्रतिबिंब आहे: केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2026 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी आज विशाखापट्टणम येथे जागतिक हत्ती दिन 2026 च्या राष्ट्रीय सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले.

उपस्थितांना संबोधित करताना कीर्ती वर्धन सिंह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने हत्तींच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी एआय, रिमोट सेन्सिंग आणि जिओस्पेशियल मॅपिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पारंपरिक ज्ञानासोबत मेळ घालून त्यांच्या शाश्वत भविष्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक समुदायांचे कल्याण सुनिश्चित करताना मानव-हत्ती संघर्ष  कमी करण्यासाठी आंतर-क्षेत्रीय सहभाग, सामुदायिक भागीदारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

 हत्ती संवर्धनाप्रती भारताची वचनबद्धता ही केवळ एक धोरणात्मक निवड नसून, ती आपल्या नागरी मूल्यांचे आणि पर्यावरणीय जबाबदारीचे प्रतिबिंब आहे, असे त्यांनी सांगितले. 33 हत्ती अभयारण्ये, वैज्ञानिकदृष्ट्या निश्चित केलेले 150 हत्ती कॉरिडॉर आणि जगातील जंगली आशियाई हत्तींपैकी 60% हत्तीसंख्येसह भारत हत्ती संवर्धनात अग्रगण्य भूमिका बजावत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  मानव-हत्ती संघर्ष हा एक गुंतागुंतीचा मुद्दा असून, विविध हितधारकांना समाविष्ट करून आणि प्रत्यक्ष पडताळणीनंतर वैज्ञानिक माहितीचा वापर करून यावर एका समन्वित उपायाची आवश्यकता आहे, असेही राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी सांगितले. 

राष्ट्रीय सोहळ्याचा एक भाग म्हणून कीर्ती वर्धन सिंह यांच्या हस्ते हत्ती संवर्धन आणि व्यवस्थापनातील अनुकरणीय योगदानाबद्दल 'गज गौरव पुरस्कार 2026' प्रदान करण्यात आले.

कीर्ती वर्धन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 'प्रोजेक्ट एलिफंट'च्या 23 व्या सुकाणू समितीची बैठकही विशाखापट्टणम येथे पार पडली. या बैठकीत हत्ती संवर्धन आणि व्यवस्थापनातील सद्यस्थितीवर विचारमंथन करण्यात आले तसेच प्रमुख उपक्रम व प्रकाशनांचे अनावरणही करण्यात आले.

विशाखापट्टणम येथे झालेल्या जागतिक हत्ती दिन 2026 च्या सोहळ्याने विज्ञान, तंत्रज्ञान, अधिवास आणि कॉरिडॉर संवर्धन, सामुदायिक सहभाग आणि समन्वित कृती यांद्वारे आपल्या राष्ट्रीय वारसा प्राण्याचे भविष्य सुरक्षित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. 

सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 


(रिलीज़ आईडी: 2299016) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Tamil , Telugu , Telugu_Vw , Malayalam