पंतप्रधान कार्यालय
जागतिक हत्ती दिनानिमित्त संवर्धनासाठीचे भारताचे प्रयत्न पंतप्रधानांनी केले अधोरेखित
Posted On:
12 AUG 2026 1:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2026
जागतिक हत्ती दिनानिमित्त आपण भारताच्या पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग राहिलेल्या भव्य प्राण्याचा उत्सव साजरा करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जगातील आशियाई वन्य हत्तींच्या संख्येच्या 60 टक्क्यांहून अधिक हत्ती भारतात आढळतात, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या देशात हत्तीसाठी 33 राखीव क्षेत्रे असून ती हत्तींसाठी अधिवास उपलब्ध करून देतात आणि त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनाच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना बळकटी देतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले. मोदी यांनी वन विभागातील सर्व कर्मचारी, शास्त्रज्ञ, पशुवैद्य, माहूत आणि स्थानिक समुदायांचा अभिमानाने उल्लेख केला. या सर्वांचे अशा प्रकारच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे ते म्हणाले.
समाज माध्यम X वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,
"जागतिक हत्ती दिनानिमित्त आपण महाकाय हत्तीचा उत्सव साजरा करतो, जो भारताच्या पर्यावरणीय वारशाचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारतात जगातील 60टक्क्यांहून अधिक वन्य आशियाई हत्ती आढळतात, ही आनंदाची बाब आहे. आपल्या देशात हत्तींसाठी 33राखीव क्षेत्रे आहेत; ती हत्तींसाठी अधिवास उपलब्ध करून देतात आणि त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनाच्या दिशेने आपल्या प्रयत्नांना बळकटी देतात. अशा सर्व प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे वन विभागातील कर्मचारी, शास्त्रज्ञ, पशुवैद्य, माहूत आणि स्थानिक समुदाय यांचा आम्हाला अभिमान आहे."
* * *
निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2298257)
अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam