पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
आशियाई सिंहांची 2015 मधील संख्या 523 वरून 2025 मध्ये 891 पर्यंत वाढली; वन अधिकारी, संवर्धक आणि स्थानिक समुदायांच्या समर्पणाचे हे द्योतक: भूपेंद्र यादव
'जागतिक सिंह दिना' निमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी वन्यजीव आणि जैवविविधता संवर्धनासाठी भारताची कटिबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट केली
Posted On:
10 AUG 2026 1:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026
जागतिक सिंह दिन 2026 निमित्त, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी सिंह संवर्धनातील भारताच्या उल्लेखनीय प्रवासाचा गौरव केला आणि वन्यजीव व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी देशाची दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट केली.
आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आशियाई सिंहांची संख्या 2015 मधील 523 वरून 2025 मध्ये 891 पर्यंत सातत्याने वाढली आहे. त्यांनी या यशाचे श्रेय वन अधिकारी, संवर्धक, स्थानिक समुदाय आणि या भव्य प्रजातीचे रक्षण करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांच्या समर्पणाला दिले.
यादव म्हणाले की, आशियाई सिंहांच्या संवर्धनातील भारताचे यश हे वन्यजीव आणि जैवविविधतेप्रती देशाच्या कटिबद्धतेचा अभिमानास्पद पुरावा आहे. भारताचा नैसर्गिक वारसा जपण्याचा आणि आशियाई सिंहाची डरकाळी पुढील अनेक पिढ्यांपर्यंत घुमत राहील याची खात्री करण्याचा संकल्प त्यांनी पुन्हा व्यक्त केला.
या निमित्ताने, आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी म्हटले की, महत्त्वाच्या अधिवासांचे रक्षण करून, संवर्धन कार्यक्रम बळकट करून आणि सह-अस्तित्वाला प्रोत्साहन देऊन भारताने जगाला दाखवून दिले आहे की विकास आणि निसर्ग हे एकत्र नांदू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी सिंहाचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी प्रोजेक्ट लायनची घोषणा केली होती. सध्या, सिंहांचे अधिवास क्षेत्र विस्तारले असून, 2020 मधील सुमारे 30,000 चौरस किलोमीटरवरून आता जवळपास 35,000 चौरस किलोमीटरपर्यंत पोहोचले आहे.
हा प्रकल्प जैवविविधता संवर्धनासाठी लँडस्केप-स्तरीय अर्थात भू स्थानानुसार आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारतो. यामध्ये अधिवास सुधारणा, रोगांचे निरीक्षण आणि पशुवैद्यकीय मदत, शास्त्रीय पद्धतीने संख्येचा मागोवा घेणे, तंत्रज्ञानाचा वापर, जैवविविधता संरक्षण, लाभांचे वाटप आणि समुदाय सहभाग या गोष्टींवर भर दिला जातो.
नेहा कुलकर्णी/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2297005)
अभ्यागत कक्ष : 97
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam