महिला आणि बालविकास मंत्रालय
1 ते 7 ऑगस्ट 2026 दरम्यान पोषण अभियानाअंतर्गत देशभरात 'जागतिक स्तनपान सप्ताहाचे'आयोजन
सप्ताहाची संकल्पना :"आयुष्याच्या शाश्वत प्रारंभासाठी स्तनपान:काळाच्या कसोटीवर सिद्ध उपायांना बळकटी द्या"
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2026 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2026
केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान देशभरात " आयुष्याच्या शाश्वत प्रारंभासाठी स्तनपान: काळाच्या कसोटीवर सिद्ध उपायांना बळकटी द्या " या संकल्पनेखाली जागतिक स्तनपान सप्ताह 2026 पाळला जात आहे.
हा सप्ताह पोषण अभियानाअंतर्गत आयोजित केला जात असून, आठवडाभरात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अंगणवाडी केंद्रे, आरोग्य संस्था, समुदाय संपर्क मंच आणि डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत.
भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान देशभरात " स्तनपानाने करा शाश्वत आयुष्याची सुरुवात: यशस्वी उपायांना अधिक बळ द्या" ("Breastfeeding for a Sustainable Start in Life: Strengthen What Works") या संकल्पनेखाली जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा केला जात आहे.
हा सप्ताह पोषण अभियाना अंतर्गत राबवला जात असून, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अंगणवाडी केंद्रे, आरोग्य संस्था, समुदाय संपर्क मंच आणि डिजिटल माध्यमांच्या द्वारे या आठवडाभरात जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
बाळाच्या आयुष्यातील पहिल्या 1,000 दिवसांच्या महत्त्वाकडे लक्ष वेधणारी ही मोहीम असून यात गरोदरपणाचा काळ, जन्मानंतरचे पहिले सहा महिने आणि बाळाच्या वयाच्या 24 महिन्यांपर्यंतचा काळ समाविष्ट आहे. या काळात मिळणारे पोषण, काळजी आणि जिव्हाळा बाळाच्या मेंदूचा विकास, रोगप्रतिकारशक्ती, वाढ, शिकण्याची क्षमता आणि आयुष्यभराचे आरोग्य घडवतात; ज्यामुळे बालकाचे अस्तित्व आणि निरोगी विकासासाठी स्तनपान हा एक अत्यंत प्रभावी उपाय ठरतो.
जन्मानंतरच्या पहिल्या तासात (ज्याला 'गोल्डन अवर' मानले जाते) नवजात बालकाला मातेचे दूध मिळेल याची खातरजमा करावी, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे. चिकाचे दूध (Colostrum), ज्याचे वर्णन अनेकदा बाळाची पहिली नैसर्गिक लस म्हणून केले जाते, ते अँटीबॉडीज आणि आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असते; त्यामुळे ते कधीही टाकून देऊ नये. माता आणि बाळामधील सुरुवातीचा स्पर्श स्तनपान सुरू करण्यास मदत करतो आणि दोघांमधील बंध दृढ करतो.
पहिल्या सहा महिन्यांसाठी केवळ आणि केवळ स्तनपान म्हणजे बाळाला पाणी, मध, बाळगुटी, ग्लुकोज किंवा फॉर्म्युला मिल्क न देता फक्त आईचे दूध देणे होय. कारण या काळात आईचे दूध एकटेच सर्व पोषण आणि पाण्याची गरज पूर्ण करते तसेच बालकाचे संसर्गापासून संरक्षण करते. सहा महिन्यांनंतर, वयानुसार योग्य तो पूरक आहार सुरू करावा आणि सोबतच दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळापर्यंत स्तनपान सुरू ठेवावे.
मातांना योग्य स्थिती आणि बाळाविषयी भावनिक ओढ याबद्दल मार्गदर्शन केले जात असून, त्यांना आणि त्यांच्या बाळाला सर्वात सोयीस्कर असणाऱ्या स्थितीत स्तनपान करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. गरजेनुसार वारंवार स्तनपान करणे आणि अडचण आल्यास अंगणवाडी सेविका, आशा सेविका किंवा जवळच्या आरोग्य केंद्राकडून मदत घेण्यावर या आठवड्यात भर दिला जात आहे. कामावर जाणाऱ्या मातांना दुधाची सुरक्षित साठवण करण्याबाबत समुपदेशन केले जात आहे, जेणेकरून स्तनपानात खंड पडणार नाही.
मंत्रालयाकडून आरोग्य व्यावसायिक, समुदाय कार्यकर्ते, कुटुंबे आणि नागरिकांना असे पोषक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, जिथे प्रत्येक मातेचे आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी सक्षमीकरण होईल आणि प्रत्येक बालकाला आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळेल.
राधिका अघोर/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295078)
आगंतुक पटल : 4