राष्ट्रपती कार्यालय
उझबेकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
Posted On:
03 AUG 2026 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
उझबेकिस्तान प्रजासत्ताकचे परराष्ट्र मंत्री सैदोव बख्तियार ओदिलोविच यांनी आज (3 ऑगस्ट, 2026) भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

ओदिलोविच आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे राष्ट्रपती भवनात स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारत आणि उझबेकिस्तान यांचे प्राचीन व्यापारी मार्गांमध्ये रुजलेले सखोल ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक संबंध आहेत. त्यांनी अधोरेखित केले की वास्तुकला, भाषा, खाद्यसंस्कृती, संगीत आणि धार्मिक परंपरांमधील सामायिक वारशामुळे द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत झाली आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की भेटीवर आलेल्या उझबेक शिष्टमंडळातील उच्चस्तरीय नेत्यांची उपस्थिती आणि या दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित भारत-उझबेकिस्तान व्यवसाय मंच हे दोन्ही देशांच्या व्यवसायांचा एकमेकांच्या बाजारपेठांवरील वाढता विश्वास दर्शविते. त्यांनी खाणकाम क्षेत्रात विशेषतः दुर्मिळ मृदा खनिजे, कृषी, औषधनिर्माण आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील सहकार्याच्या प्रचंड क्षमतेवरही प्रकाश टाकला.

राष्ट्रपतींनी हे नमूद करताना आनंद व्यक्त केला की, उझबेकिस्तानमधील 3,000 हून अधिक अधिकारी, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांनी आमच्या आयटीईसी प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा आणि इतर शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेतला आहे तर 16,000 हून अधिक भारतीय विद्यार्थी उझबेकिस्तानमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांनी यावर जोर दिला की हे दोन्ही देश एक सेतू म्हणून काम करतात आणि परस्पर सामंजस्य व दृढ व्यक्ती -व्यक्ती संबंधांना प्रोत्साहन देतात.
या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेमुळे आपल्या दोन राष्ट्रांमधील मैत्री, विश्वास आणि सहकार्याचे संबंध अधिक दृढ होतील यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली.
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2294012)
अभ्यागत कक्ष : 52