पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे
Posted On:
01 AUG 2026 8:43AM by PIB Mumbai
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकर यांचे अभिनंदन केले आहे.
तेजस्विन शंकर यांनी सर्व दहा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट, अष्टपैलू कामगिरी केली असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
“भारतीय खेळाडू सातत्याने इतिहास घडवत आहेत, देशाला त्यांचा अभिमान आहे!
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 'डेकॅथलॉन' स्पर्धेत तेजस्विन शंकरने कांस्यपदक जिंकले आहे. त्याने स्पर्धेच्या सर्वच्या सर्व, दहा फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट आणि अष्टपैलू कामगिरी केली. त्याचे अभिनंदन. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #CWG2026”
***
यश राणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2292871)
अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein:
Telugu
,
Kannada
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam