महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिला आणि मुलांसाठीच्या महत्त्वाच्या हेल्पलाइन सेवांचा त्वरित लाभ घेण्यासाठी नागरिकांना  'मिशन शक्ती' ॲप डाउनलोड करण्याचे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे आवाहन

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2026 11:20AM by PIB Mumbai

 

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नागरिकांना 'मिशन शक्ती' ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे. हे ॲप महिला आणि मुलांना केवळ एका क्लिकवर सुरक्षा आणि सहाय्य उपलब्ध करून देते.

'एक्स ('X)' वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री म्हणाल्या  की, मिशन शक्ती अॅप महिला आणि मुलांची सुरक्षा, सहाय्य आणि सक्षमीकरणाच्या सरकारच्या संकल्पाला आणखी बळकटी देईल. त्यांनी म्हटले आहे की, हे ॲप एकाच प्लॅटफॉर्मवर महत्त्वाच्या हेल्पलाईन सेवांची जलद आणि सुलभ उपलब्धता सुनिश्चित करते. यात महिला हेल्पलाईन 181, आपत्कालीन सेवा 112, पोषण आणि पीएमएमव्हीवाय हेल्पलाईन 1515, राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन 1930, लीगल एड (एनएएलएसए) 15100, टेली-मानस 14416 आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 याचा समावेश आहे.

सर्वांनी 'मिशन शक्ती' ॲप डाउनलोड करावे, आणि या महत्त्वाच्या सेवांची माहिती आपल्या कुटुंबीयांना आणि ओळखीच्या व्यक्तींना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

***

अंबादास यादव/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292274) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Bengali , Gujarati , Tamil , Kannada