पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या श्रीशंकर याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
30 JUL 2026 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,30 जुलै 2026
ग्लासगो इथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल श्रीशंकर याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी त्याच्या कामगिरीचे वर्णन अत्युत्कृष्ट असे केले आणि हे पदक त्याच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी मिळाल्याचे नमूद केले.
श्रीशंकरच्या यशामुळे अनेक तरुणांना ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळेल, असे मोदी म्हणाले आणि त्यांनी श्रीशंकरला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले:
"श्रीशंकरचे रौप्यपदकासाठी अभिनंदन!अप्रतिम कामगिरी!
पदक जिंकल्याबद्दल त्याला हार्दिक शुभेच्छा, आणि तेही त्याच्या सर्वोत्तम उडीसह. त्याच्या यशामुळे अनेक तरुणांना ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळेल. त्याच्या आगामी प्रयत्नांसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा"
#CWG2026”
सुषमा काणे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2291916)
अभ्यागत कक्ष : 39
Read this releasein:
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam