पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांसाठीच्या गोळाफेक F57 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शर्मिला यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
28 JUL 2026 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2026
ग्लासगो इथे सुरू असलेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांसाठीच्या गोळाफेक F57 या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल शर्मिला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
या हंगामामधील त्यांची ही सर्वोत्तम फेक म्हणजे उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्स मधील सुवर्णपदकांची दोन दशकांची दीर्घ प्रतिक्षा संपुष्टात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मोदी यांनी यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी म्हटले आहे की
“ग्लासगोमध्ये इतिहास घडला आहे.
शर्मिला यांना महिला गोळाफेक f57 क्रीडा प्रकारात मिळालेले सुवर्णपदक फार खास आहे आणि या हंगामातील त्यांची ही सर्वोत्तम फेक होती. यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा अॅथलेटिक्स मधील सुवर्णपदकासाठीची दोन दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आली
पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा
#CWG2026”
* * *
निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2290391)
अभ्यागत कक्ष : 39
Read this releasein:
Kannada
,
Bengali
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam