पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी मांडले  'मन की बात' च्या 136 व्या भागातील भाषणाचे मुख्य मुद्दे

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2026 9:33PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या 136 व्या भागातील आपल्या भाषणातील मुख्य मुद्दे मांडले आहेत.
'एक्स' (X) समाज माध्यमावरील  टिप्पण्यांच्या मालिकेत मोदी म्हणाले;
"आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या आणि देशाला अधिक बलवंत बनवणाऱ्या सर्वांना सलाम!
#MannKiBaat"

"'कॅच द रेन' (पावसाचं पाणी साठवा) मोहिमेचा संदेश सोपा आहे... पाण्याचे प्रभावीपणे संवर्धन करणे. या संदर्भात मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओदिशातील प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला.
#MannKiBaat"

"कष्टाने मिळालेला विजय विशेष असतो, पण तो जेव्हा एखाद्या ऐतिहासिक मैदानावर मिळतो, तेव्हा आनंद द्विगुणीत होतो!
आपल्या महिला क्रिकेट संघाने जेव्हा 'लॉर्ड्स' मैदानावर विजय मिळवला, तेव्हा अगदी हेच घडले! संघाचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
#MannKiBaat"

"केरळमधील एर्नाकुलम येथे एक अनोखा उपक्रम होत आहे. यात फुटबॉलला संस्कृत भाषेसोबत सुंदरपणे जोडले आहे.
#MannKiBaat"

"गेला महिना विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रासाठी उत्कृष्ट राहिला आहे. 'विक्रम-1'  च्या यशाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच वेळी, विविध ऑलिंपियाडमधील यश निश्चितच अधिकाधिक तरुणांना विज्ञानात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल.
#MannKiBaat"

"जम्मू आणि कश्मीरमध्ये 'वागू'  चटई परंपरेचे पुनरुज्जीवन आणि ती लोकप्रिय करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो... मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्हीही तुमच्या घरी एक वागू नक्की आणा.
#MannKiBaat"

"गुजरात आणि उत्तर प्रदेशातील उल्लेखनीय प्रयत्न आपण निसर्गाला किती महत्त्व देतो हे दर्शवतात.
#MannKiBaat"

"डॉ. रोनाल्डो लैशराम यांच्या कृतीने हे दाखवून दिले आहे की, उत्तम कामगिरी बजावूनही आणि यश  मिळूनही माणूस नेहमी आपल्या मुळांशी जोडलेला राहतो.
#MannKiBaat"

"खादीचे पुनरुज्जीवन मोठ्या प्रमाणावर होत असून, गेल्या 12 वर्षांत तिच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या लोकप्रियतेमुळे स्थानिक उद्योगांना बळ मिळत आहे आणि हजारो कारागिरांसाठी संधी निर्माण होत आहेत. येत्या सणासुदीच्या काळात आपण सर्वांनी किमान एक तरी खादीचे उत्पादन खरेदी करूया आणि स्थानिक उत्पादनांच्या खरेदीच्या (व्होकल फॉर लोकल') आग्रहाला  अधिक गती देऊया.

#MannKiBaat"

"त्रिपुरातील श्री सुर्जा कुमार देबबर्मा जी यांनी 'चोंगप्रेन्ग' वाद्याला लोकप्रिय करण्यासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या संगीत परंपरा आजही किती जिवंत आहेत हे यावरून दिसून येते.
#MannKiBaat"

"उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील बचतगटांच्या महिलांनी एक असा स्वदेशी हर्बल (औषधी) चहा तयार केला आहे, ज्याने अनेक माता-भगिनींच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा नवा सुगंध भरला आहे. आपल्या अनोख्या चव आणि गुणांमुळे त्यांच्या ब्रँडने अतिशय कमी वेळात लोकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
#MannKiBaat"

"बिहारमधील सीतामढी येथे सिंगल युज प्लास्टिक (एकदा वापरुन फेका) च्या कचऱ्यापासून आकर्षक आणि टिकाऊ  बाकडी  तयार केली जात आहेत. 'वेस्ट टू वेल्थ' (कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू) चा हा अनोखा प्रयत्न दर्शवतो की रिड्यूस (कमी वापर), रियूज (पुनर्वापर) आणि रिसायकल (पुनर्प्रक्रिया) ही आता केवळ एक घोषणा राहिलेली नसून ती जीवनशैलीचा भाग बनत आहे.
#MannKiBaat"

"मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की, गणेशोत्सवात मातीची मूर्ती बनवण्याच्या माझ्या आवाहनाला देशवासीयांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी मला पाठवलेल्या संदेशांमधून गणपतीच्या भक्तीसोबतच निसर्गाप्रती असलेली त्यांची समर्पणाची भावना दिसून येते.
#MannKiBaat"

***

सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2289728) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati