पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
23 JUL 2026 8:22AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. चंद्रशेखर आझाद यांचे अदम्य साहस आणि अढळ देशभक्ती भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा गौरव आहे असे मोदी यांनी नमूद केले.
मोदी यांनी म्हटले आहे की, त्यांनी असंख्य भारतीय तरुणांना राष्ट्र सेवेसाठी स्वतःला झोकून देण्यास प्रेरित केले आणि त्यांचा हा दृढ निर्धार आजही अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.
'एक्स' वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
"वीर चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. त्यांचे अदम्य साहस आणि अढळ देशभक्ती भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा गौरव आहे. त्यांनी असंख्य भारतीय तरुणांना राष्ट्रसेवेसाठी स्वतःला झोकून देण्यास प्रेरित केले. त्यांचा हा दृढ निर्धार अनेक पिढ्यांना यापुढेही प्रेरणा देत राहील ."
***
AshishSangle / SushamaKane / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2288210)
अभ्यागत कक्ष : 39
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam