राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभा अध्यक्ष सी.पी.राधाकृष्णन यांनी आज राज्यसभेच्या दालनात नवनिर्वाचित/पुनर्निर्वाचित सदस्यांना दिली शपथ

Posted On: 20 JUL 2026 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2026

राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यसभा दालनात डॉ. मुकेशभाई जे. राठवा, पवन खेरा, महेश केवट, जेम्स पांगसांग कोंगकल संगमा, खिआंगते लालटलुआंगकिमा, डॉ. सतीश पुनिया, प्रकाश चिक बराईक, सुश्मिता देव आणि सुखेंदू शेखर रे या नऊ नवनिर्वाचित/पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ/प्रतिज्ञा दिली.  

यापैकी पाच सदस्यांनी हिंदीत, दोन सदस्यांनी इंग्रजीत तर दोन सदस्यांनी बंगालीत शपथ घेतली. तीन सदस्य पश्चिम बंगाल राज्यातील असून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोरम आणि राजस्थानमधून प्रत्येकी एक सदस्य आहे.

राधिका अघोर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2286542) अभ्यागत कक्ष : 44