पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून कतारचे माजी अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त

Posted On: 12 JUL 2026 3:20PM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे माजी अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी त्यांचे वर्णन दूरदृष्टी असलेले नेते म्हणून केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कतारने विकास आणि समृद्धीची उल्लेखनीय उंची गाठल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी त्यांना खरे मित्र संबोधूनही त्यांचे स्मरण केले. फेब्रुवारी 2024 मध्ये कतार दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेण्याचा सन्मान लाभल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी कतारचे अमीर महामहिम शेख तमीम बिन हमद अल थानी, संपूर्ण राजघराणे आणि कतारच्या जनतेप्रती आपल्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या.

पंतप्रधानांनी X वर आपल्या शोकसंदेशात लिहिले;

“कतारचे माजी अमीर महामहिम शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनामुळे आम्हाला अत्यंत दुःख झाले आहे. ते दूरदृष्टी असलेले नेते होते आणि त्यांनी कतारला विकास आणि समृद्धीच्या उच्च शिखरावर नेले. फेब्रुवारी 2024 मध्ये माझ्या कतार दौऱ्यादरम्यान त्यांची भेट घेण्याचा सन्मान मला लाभला होता आणि मी त्यांना खरा मित्र म्हणूनही त्यांचे स्मरण करतो. कतारचे अमीर महामहिम शेख तमीम बिन हमद अल थानी, संपूर्ण राजघराणे आणि कतारच्या जनतेप्रती मी माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो.

@TamimBinHamad"

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2283870) अभ्यागत कक्ष : 68