युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक खेळांसाठीच्या सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघांना 15 जुलैपर्यंत लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक पात्रता आणि खेळाडू निवड प्रक्रिया प्रकाशित करण्याचे दिले निर्देश
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2026 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,9 जुलै 2026
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक खेळांसाठी खेळाडूंच्या निवडीकरिता अवलंबले जाणारे निकष आणि प्रक्रियेसह ऑलिम्पिक पात्रता आणि निवड मार्ग प्रकाशित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंत्रालयाने पुनरुच्चार केला आहे की ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा , पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यांसारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धांसाठीचे निवड धोरण आणि निकष याविषयीची माहिती संबंधित खेळांच्या प्रारंभाच्या किमान दोन वर्षे आधी प्रसिद्ध करून संबंधित राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली पाहिजे.
निवड धोरण आणि निकष राष्ट्रीय क्रीडा संघटनांच्या सदस्य युनिट्स आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणासोबतही सामायिक केले पाहिजेत.
लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 14 जुलै ते 30 जुलै 2028 या कालावधीत होणार आहेत.
मंत्रालयाने कळवले आहे की लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक खेळांसाठीची पात्रता प्रक्रिया संबंधित आंतरराष्ट्रीय महासंघांकडून जाहीर करण्यात आले असून खालील लिंकवर उपलब्ध आहेत:
https://www.olympics.com/ioc/documents/olympic-games/los-angeles-2028-olympic-games
त्यानुसार, सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय क्रीडा संघटनांना ऑलिम्पिक पात्रता आणि निवड प्रक्रिया, ज्यामध्ये खेळाडूंच्या निवडीसाठी अवलंबले जाणारे निकष आणि प्रक्रिया यांचा समावेश असेल, त्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर तात्काळ आणि 15 जुलै 2026 पूर्वी प्रकाशित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्रीडा संघटनांना सर्व संलग्न राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संघटनांमध्ये निवडीची प्रक्रिया प्रसारित करण्यास सांगण्यात आले आहे.
सर्व संबंधितांच्या हितासाठी खेळांसाठीच्या पात्रतेचा मार्ग, निवडीचे निकष आणि निवड प्रक्रिया पुरेशा वेळेपूर्वीच सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देऊन खेळाडू निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282998)
आगंतुक पटल : 15