पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर-जनरल यांची घेतली भेट
Posted On:
09 JUL 2026 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,9 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाच्या गव्हर्नर-जनरल सॅम मॉस्टिन एसी यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीची वाढती व्याप्ती आणि विविधता यांवर विचारविनिमय केला. त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढत्या आर्थिक भागीदारीचे स्वागत केले आणि व्यापार, गुंतवणूक, शिक्षण व नवोन्मेष या क्षेत्रांतील वाढत्या परस्पर संबंधांमुळे नवीन संधी निर्माण होतील तसेच दोन्ही देशांतील जनतेला प्रत्यक्ष लाभ मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, दोन्ही देशांमधील वाढत्या क्रीडा संबंधांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आणि भारत यजमानपद भूषवणाऱ्या 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि 2032 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला.
पंतप्रधानांनी नमूद केले की, या द्विपक्षीय संबंधांसाठी दोन्ही देशांच्या लोकांमधील चैतन्यशील संबंध मजबूत आधार राहिले आहेत.
भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना गती देण्यासाठी दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी गव्हर्नर-जनरल मॉस्टिन यांची प्रशंसा केली.
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2282814)
अभ्यागत कक्ष : 64
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam