सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिन सोहळ्यात होणार विविध उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन 


जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत 232 धान्य साठवणूक गोदामांचे होणार उद्घाटन आणि हस्तांतरण

‘सहकार वन’ या अमूल आणि एनसीसीएफच्या 64 एकर सहकारी वनीकरण प्रकल्पाचे होणार भूमिपूजन

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील बीबीएसएसएलच्या टिश्यू कल्चर सुविधांची होणार पायाभरणी 

एनसीडी 3.0 आणि जिओ-टॅग मोबाईल ॲप्लिकेशन तसेच एनडीडीबीच्या दूध पुरवठा आढावा डॅशबोर्ड पोर्टलचा होणार प्रारंभ

50,000 पॅक्स (पीएसीएस) चे ई-पीएसीएसमध्ये होणार रूपांतर

‘सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी’ या एनयूसीएफडीसीच्या शहरी सहकारी बँकांसाठी उपयुक्त असणाऱ्या दोन प्रमुख डिजिटल उपक्रमांचे अमित शहा करणार प्रारंभ 

सहकारी दूध उत्पादक संघटना मल्टी-स्टेट लिमिटेड आणि गोमय सहकारी संस्था मल्टी-स्टेट लिमिटेडचे होणार उद्घाटन  

बियाणे प्रणाली मजबूत करण्यासाठी बीबीएसएसएल आणि आयसीएआर यांच्यात होणार सामंजस्य करार ; दुग्ध सहकारी संस्थांसाठी आदर्श उपविधी होणार प्रसिद्ध

प्रविष्टि तिथि: 05 JUL 2026 5:21PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या, 6 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' या संकल्पनेनुसार आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जाणार आहे. अमित शहा यांनी सहकारी क्षेत्राला अधिक पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा अवलंब, संस्थात्मक बळकटीकरण आणि तळागाळातील घटकांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केले आहे.

या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचे आणि उपक्रमांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन करतील. यामध्ये 135 धान्य साठवण गोदामांचे हस्तांतरण, 85 गोदामांचे उद्घाटन आणि 47 धान्य साठवण गोदामांच्या उभारणीचे भूमिपूजन यांचा समावेश आहे. 

तसेच अमूल आणि एनसीसीएफ यांच्या सहकार वन उपक्रमाचे भूमिपूजन, उत्तर प्रदेशातील बाराबंकी आणि महाराष्ट्रातील जळगाव येथे बीबीएसएसएलच्या टिश्यू कल्चर सुविधांचे भूमिपूजन, एनसीडी 3.0 आणि जिओ-टॅग मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण, एनडीडीबीच्या मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचे उद्घाटन, कोऑपरेटिव्ह इनपुट्स अँड सर्व्हिसेस डिलिव्हरी मल्टी-स्टेट लिमिटेड अंतर्गत दुग्ध जनावरांची उत्पादकता वाढविण्यासंबंधी उपक्रम, कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन मल्टी-स्टेट लिमिटेड आणि गोमय कोऑपरेटिव्ह सोसायटी मल्टी-स्टेट लिमिटेडचे उद्घाटन, तसेच एनयूसीएफडीसीच्या दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे सहकार सीबीएस या केंद्रीकृत कोअर बँकिंग प्लॅटफॉर्मचे आणि सहकार सहयोगी या शहरी सहकारी बँकांसाठी विकसित करण्यात आलेल्या संवादात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचे ई-पॅक्समध्ये रूपांतर करण्यात येणार असून, तळागाळातील सहकारी संस्थांच्या डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

कार्यक्रमादरम्यान बीबीएसएसएल आणि आयसीएआर यांच्यात बियाणे व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात येतील. याच प्रसंगी अमित शाह दुग्ध सहकारी संस्थांसाठी आदर्श उपविधी तसेच गेल्या पाच वर्षांतील सहकार मंत्रालयाच्या कामगिरीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करतील.

हा समारंभ सहकारातून समृद्धी आणि विकसित तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार शेतकरी, महिला, युवा, लघु उत्पादक, दुग्ध उत्पादक, शहरी सहकारी संस्था आणि ग्रामीण संस्थांना जोडणारी सक्षम सहकार व्यवस्था उभारण्याच्या सहकार मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणारा ठरेल.

***

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2281366) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Malayalam