पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पेरूच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल केइको फुजिमोरी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2026 1:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेरूच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल केइको फुजिमोरी यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि पेरू यांच्यातील दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर भर देत, पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी 'X' वर पोस्ट केले:

"पेरूच्या राष्ट्रपती निवडणुकीत घवघवीत विजय मिळवल्याबद्दल केइको फुजिमोरी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.

भारत पेरू सोबतचे आपले जवळचे मैत्रीपूर्ण संबंध अत्यंत मोलाचे मानतो. विविध क्षेत्रांतील आपली द्विपक्षीय भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. आपला कार्यकाळ यशस्वी होवो, हीच सदिच्छा! दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपल्यासोबत मिळून काम करण्यास मी उत्सुक आहे."

— @KeikoFujimori

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2281065) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Malayalam