अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-इस्रायल द्विपक्षीय गुंतवणूक करार (बीआयए) आजपासून अंमलात

प्रविष्टि तिथि: 04 JUL 2026 9:00AM by PIB Mumbai

 

भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांदरम्यान गेल्या वर्षी 8 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय गुंतवणूक करार (बीआयए) झाला होता. हा करार आजपासून म्हणजेच 4 जुलै 2026 पासून अंमलात आला आहे.

हा बीआयए द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या आणि सुरक्षित तसेच पूर्वानुमानित गुंतवणूक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

हा बीआयए गुंतवणूक आणि गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असून, सार्वजनिक धोरणाशी संबंधित वैध उद्दिष्टांनुसार सार्वभौम धोरणात्मक अवकाश राखण्यासाठी पुरेशी लवचिकताही प्रदान करतो. हा करार आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कायद्याच्या आधुनिक तत्त्वांशी आणि विकसित होत असलेल्या न्यायशास्त्राशी सुसंगत आहे.

या बीआयएमुळे सीमापार गुंतवणूक उपक्रमांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असून, भारत आणि इस्रायल यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होईल.

भारत-इस्रायल बीआयए 2026 करार वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://dea.gov.in/files/bilateral_investment_treaties_document/India-Israel%20BIA%20English%20Version.pdf

***

हर्षल अकुडे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2281029) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam