पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न हीच यशाची खरी गुरुकिल्ली, असे सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 02 JUL 2026 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित सामायिक केले:

“नानाश्रान्ताय श्रीरस्तीति रोहित शुश्रुम।

पापो नृषद्वरो जन इन्द्र इच्चरतः सखा चरैवेति॥"

या सुभाषितातून सातत्यपूर्ण प्रयत्न हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचा संदेश देण्यात आला आहे. जीवनात जो धैर्य, दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाच्या बळावर सतत पुढे जात राहतो तोच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो, असे या सुभाषितात अधोरेखित करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटले आहे:

"सातत्यपूर्ण प्रयत्न हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. जीवनात तीच व्यक्ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते जी ध्येय, दृढ संकल्प आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहते."

नानाश्रान्ताय श्रीरस्तीति रोहित शुश्रुम।

पापो नृषद्वरो जन इन्द्र इच्चरतः सखा चरैवेति॥

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2280423) अभ्यागत कक्ष : 43