राज्यसभा सचिवालय
राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यसभा दालनात नवनिर्वाचित/ पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली
Posted On:
29 JUN 2026 6:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2026
राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यसभेच्या दालनात सात नवनिर्वाचित/पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये मानसिंग मेरामन परमार, तरुण चुघ, डॉ. अलका सिंग, जितेंद्र मेघजीभाई कंझारिया, राजेंद्र हिरालाल जैन, एम. नागराजा आणि अधिकारीमायूम शारदा देवी यांचा समावेश आहे.
चार सदस्यांनी हिंदी भाषेत, तर प्रत्येकी एका सदस्याने कन्नड, पंजाबी आणि मणिपुरी भाषेत शपथ घेतली. यापैकी दोन सदस्य गुजरात राज्यातील आहेत, तर उर्वरित सदस्यांपैकी प्रत्येकी एक सदस्य कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर आणि राजस्थान या राज्यांमधील आहेत.
याप्रसंगी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश; राज्यसभेतील सभागृह नेते आणि आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायने व खते मंत्री जगत प्रकाश नड्डा; संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू; कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल; राज्यसभेचे सदस्य जयराम रमेश व प्रफुल्ल पटेल; राज्यसभेचे महासचिव पी. सी. मोदी आणि सचिवालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2279070)
अभ्यागत कक्ष : 80