अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयने सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा केला पर्दाफाश ; विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत 15 किलो विदेशी बनावटीचे सोने जप्त; 15 जणांना अटक 

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2026 3:53PM by PIB Mumbai

 

विदेशी सोन्याच्या तस्करीविरोधात केलेल्या एका मोठ्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावरून कार्यरत असलेल्या एका अत्यंत संघटित सोने तस्करी सिंडिकेटचा यशस्वीपणे पर्दाफाश करून ते उध्वस्त केले आहे. या कारवाईत डीआरआयने विदेशी बनावटीचे तस्करीचे सोने वितळवण्यासाठी वापरण्यात येणारी सोने वितळवण्याची सामग्री शोधून काढली आणि तिचा पर्दाफाश केला.

सोने वितळवण्याच्या मुंबईतील ठिकाणाहून जप्त केलेले सोने 

संपूर्ण तस्करी साखळीत सामील असलेल्या एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात विमानतळ कर्मचारी, तिचा हँडलर, तीन मध्यस्थ, वितळण केंद्राचा ऑपरेटर आणि या प्रक्रियेत गुंतलेल्या तीन व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय, सुमारे 6 किलो विदेशी बनावटीचे तस्करीचे सोने घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे.

हे प्रकरण सोने तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांच्या वाढत्या अत्याधुनिकतेवर प्रकाश टाकते, ज्या विमानतळांवरील अंतर्गत कर्मचारी  प्रवेशाचा अधिकाधिक गैरफायदा घेतात आणि पकडले जाण्यापासून वाचण्यासाठी स्तरीय वितरण जाळ्यांचा वापर करतात. बेंगळुरु येथील आणखी एका कारवाईत डीआरआयने एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या कपड्यांच्या थरांमध्ये चतुराईने लपवलेले पेस्टच्या स्वरूपातील 1.8 किलो 24 कॅरेट सोने जप्त केले. त्यानंतर त्याच्या निवासस्थानी केलेल्या पुढील झडतीत सुमारे 1.5 किलो सोन्याचे दागिने, 45 किलो चांदी आणि भारतीय व विदेशी चलन जप्त करण्यात आले. त्या व्यक्तीला अटक करण्यात आली.

अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवलेले पेस्टच्या स्वरूपातील सोने बेंगळुरूमध्ये जप्त

या आठवड्याच्या सुरुवातीला 'डीआरआय'ने हैदराबाद, राजकोट, कालिकत, विशाखापट्टणम, गुवाहाटी आणि पेट्रापोल येथील विमानतळ, रेल्वे स्थानकांवर अनेक मोहिमा राबवल्या. या मोहिमांमधून परदेशी बनावटीचे आणखी 6 किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले असून याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

विशाखापट्टणम येथे जप्त केलेले सोने

सोन्याच्या तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या या कारवाईत अंदाजे 23 कोटी रुपये किमतीचे 15 किलो सोने आणि 45 किलो चांदी जप्त करण्यात आली असून 15 जणांना अटक करण्यात आली आहे.

***

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2278243) आगंतुक पटल : 52
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu , Malayalam