पंतप्रधान कार्यालय
कोलकाता इथल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून सानुग्रह अनुदानाची केली घोषणा
Posted On:
25 JUN 2026 11:13AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2026
कोलकाता येथे एका झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
बाधित लोकांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करत आहे, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून (PMNRF) प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
मोदी यांनी एक्सवर (X) पोस्ट केले:
"कोलकाता इथे काल झालेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफ (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल. तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील. बाधितांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी राज्य सरकार अहोरात्र काम करत आहे: PM @narendramodi"
* * *
यश राणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2277645)
अभ्यागत कक्ष : 53
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada