पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

व्हेनेझुएलामध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीवर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 25 JUN 2026 11:01AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलामध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे झालेल्या विध्वंस आणि जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारतीय जनतेच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करताना, मोदी यांनी भूकंपात जखमी झालेल्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि या दुर्घटनेतल्या सर्व बाधितांविषयी संवेदना व्यक्त केली.

या कठीण काळात शक्य ती सर्व मदत करण्यासाठी भारत तत्पर असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले:

"व्हेनेझुएलामध्ये आलेल्या तीव्र भूकंपामुळे झालेल्या विध्वंसामुळे खूप दुःख झाले आहे.

भारतातल्या जनतेच्या वतीने, मी व्हेनेझुएलाचे सरकार आणि तेथील लोकांविषयी, विशेषतः ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा कुटुंबांविषयी भावपूर्ण संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि या कठीण काळात आम्ही सर्व बाधितांसोबत खंबीरपणे उभे आहोत.

भारत शक्य ती सर्व मदत करण्यासाठी तत्पर आहे."

 

* * *

यश राणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2277638) अभ्यागत कक्ष : 63