भूविज्ञान मंत्रालय
इनकॉइसद्वारे भारताच्या सागरी क्षेत्र संरक्षणासाठी विशेष 'एल निनो' बुलेटिन्स प्रकाशित करण्यास सुरुवात
प्रविष्टि तिथि:
23 JUN 2026 8:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2026
सागरी भागावर सध्या प्रभावी असलेल्या 'एल निनो'च्या संभाव्य परिणामांची माहिती अधोरेखित करण्यासाठी इनकॉइस (आयएनसीओआयएस) ने विशेष 'एल निनो' बुलेटिन्सप्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिल्या विशेष बुलेटिनचे 22 जून 2026 रोजी इनकॉइस येथे आयोजित कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
या बुलेटिननुसार, 'एल निनो' ही भौगोलिक घटना सध्या निरंतर विकसित होत असून हिवाळ्याच्या हंगामात (नोव्हेंबर 2026 ते जानेवारी 2027) ती टोक गाठण्याची अपेक्षा आहे. याचा परिणाम म्हणून, एप्रिल/मे 2027 पर्यंत हिंद महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील.
मान्सूनच्या काळात बंगालच्या उपसागरातील समुद्र खवळलेला राहील आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवर किनारपट्टीची धूप होण्याचे आणि पूर येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे, अरबी समुद्र आणि पश्चिम किनारपट्टीलगतचा समुद्र नेहमीपेक्षा शांत राहण्याची शक्यता आहे. यामुळे सागरी क्षेत्रांतील कामे करण्यासाठी अधिक कालावधी उपलब्ध होऊ शकेल. यंदाच्या मान्सूनच्या हंगामात पश्चिम किनारपट्टीवर किनारपट्टीची धूप होण्याचे आणि जलमयतेचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
सर्व सागरी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी इनकॉइसद्वारे वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना, इशारे आणि सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन करावे असा सल्ला इनकॉसने त्यांना दिला आहे. पुढील विशेष बुलेटिन जुलै 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाणार आहे.

Release of Specialized El Nino Bulletin by Shri. Konda Vishweshwar Reddy Garu, Hon'ble Member of Parliament, Chevella Constituency.

Potential impacts of ongoing El Nino event on Indian Ocean Maritime sectors.
* * *
सोनाली काकडे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2277230)
आगंतुक पटल : 14