पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदेविषयक व्यवस्था मजबूत करण्यावर तसेच न्याय मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासंदर्भात एक लेख केला सामायिक

Posted On: 22 JUN 2026 3:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे.

कायदेविषयक परिसंस्था मजबूत करण्यासाठी, न्याय मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांसाठी सार्वजनिक सेवा अधिक सुलभ करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. डिजिटल आणि भौतिक दोन्ही प्रकारच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याच्या प्रयत्नांमुळे वकील आणि न्यायाधीशांचे काम अधिक सुलभ झाले आहे, यावरही लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे ;

“या लेखात, केंद्रीय राज्यमंत्री @arjunrammeghwal यांनी कायदेविषयक व्यवस्था मजबूत करण्यासाठी, न्याय मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांसाठी सार्वजनिक सेवा अधिक सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली आहे.

डिजिटल आणि भौतिक दोन्ही प्रकारच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याच्या प्रयत्नांमुळे वकील आणि न्यायाधीशांचे काम अधिक सुलभ झाले आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.”

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2276573) अभ्यागत कक्ष : 37