पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भावनाबेन पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 22 JUN 2026 1:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रभुलभाई पटेल यांच्या पत्नी भावनाबेन पटेल यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

प्रफुल्लभाई पटेल यांच्या कुटुंबाशी आपले अनेक वर्षांपासून घनिष्ठ परिचयाचे आणि सलोख्याचे संबंध होते, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी शोकाकुल कुटुंबाप्रती आपल्या भावपूर्ण संवेदना व्यक्त केल्या आणि दिवंगत आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो अशी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी 'एक्स' वरील संदेशात लिहिले;

 

* * *

नितीन फुल्‍लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2276531) अभ्यागत कक्ष : 54