पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामाईक केला ‘योग आणि निरोगी वार्धक्य’ या विषयावरील लेख
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2026 12:41PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला एक लेख सामाईक केला आहे.
हा लेख योगाच्या आणि मानवी आरोग्यावर व कल्याणावर होणाऱ्या सखोल परिणामांवर प्रकाश टाकतो. 'निरोगी वार्धक्यासाठी योग या यंदाच्या संकल्पनेचा उल्लेख यात असून व्यक्तीगत अनुभवानुसार, योगसाधनेचे रूपांतर ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य अशा सौम्य आणि सहज आचरणात येण्याजोग्या पद्धतींमध्ये विचारपूर्वक करण्यात आले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे अधोरेखित करणारा , हा लेख प्रत्येकाला योग ही आयुष्यभर चालणारी सांस्कृतिक आणि आरोग्यदायी सवय म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करतो.
पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स या समाजमाध्यमावर वर पोस्ट केले की,
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, माननीय उपराष्ट्रपती तिरु सी. पी. राधाकृष्णन, योगाचा मानवी आरोग्यावर व कल्याणावर होणाऱ्या सखोल परिणामांवर भाष्य करत आहेत. 'निरोगी वृद्धत्वासाठी योग ' या यंदाच्या संकल्पनेचा उल्लेख करत पंतप्रधान लिहितात की, वैयक्तिक अनुभवांनुसार योगसाधनेचे रूपांतर ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य अशा सौम्य आणि सहज आचरणात येण्याजोग्या पद्धतींमध्ये विचारपूर्वक करण्यात येऊ शकते, हा विचार या लेखात मांडला आहे.
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे अधोरेखित करत, ते प्रत्येकाला योग ही आयुष्यभर चालणारी सांस्कृतिक आणि आरोग्यदायी सवय म्हणून स्वीकारण्याचे आवाहन या लेखात केल्याचेही म्हटले आहे.
***
राधिका अघोर/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276242)
आगंतुक पटल : 19