पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या जन्मदिनी, त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला दिली भेट
Posted On:
20 JUN 2026 8:58PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वाढदिवशी त्यांच्यासोबत ओदिशातील पहाडपूर गावाला भेट देणे हा आपण आपला बहुमान मानत असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पहाडपूर हे राष्ट्रपतींचे स्वतःचे गाव असून त्यांनी केलेले कार्य खरोखरच अत्यंत प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश,
राष्ट्रपतीच्या सोबत त्यांच्या जन्मदिनी ओदिशातील पहाडपूर गावाला भेट देण्याचा बहुमान मला लाभला. हे त्यांचे गाव असून त्यांनी केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.
त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना.
@rashtrapatibhvn
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2275896)
अभ्यागत कक्ष : 51
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam