आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनहितार्थ 16 निश्चित मात्रांच्या संयुक्त औषधांच्या (FDCs) उत्पादन, विक्री आणि वितरणावर घातली बंदी
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2026 12:42PM by PIB Mumbai
जनतेचे आरोग्य जपण्याच्या आणि औषधांच्या तर्कसंगत वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 च्या कलम 26अ अंतर्गत अधिसूचना जारी करून 16 निश्चित मात्रांच्या संयुक्त औषधांच्या (FDCs) उत्पादन, विक्री आणि मानवी वापरासाठी वितरणावर बंदी घातली आहे. या अधिसूचना तात्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत.
वैज्ञानिक मूल्यांकन आणि तज्ञ समितीच्या शिफारशींच्या आधारे, सरकारने अशा 16 निश्चित मात्रांच्या संयुक्त औषधांवर कारवाई केली आहे. या 16 औषधांच्या वापराला उपचारात्मकदृष्ट्या योग्य असल्याचा ठोस आधार आढळला नाही आणि त्यांच्या संभाव्य धोक्यांच्या तुलनेत त्यांचा सतत वापर फायदेशीर मानला गेला नाही. ही प्रतिबंधित एफडीसी औषधे विविध उपचारात्मक श्रेणींमध्ये मोडणारी असून त्यात काही त्वचारोगविषयक औषधे, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधे, तसेच प्रतिजैविक-आधारित औषधांचा समावेश आहे.
जनतेला केवळ सुरक्षित, प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित औषधेच उपलब्ध व्हावीत, हे सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे, मंत्रालयाने नमूद केले आहे. यापूर्वीही, सखोल वैज्ञानिक पुनरावलोकनानंतर अनेक तर्कहीन एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात आली होती. ही कारवाई रुग्ण सुरक्षा आणि पुरावा-आधारित आरोग्यसेवेप्रती सरकारची वचनबद्धता अधिक दृढ झाल्याचे निदर्शनास आणून देते.
या अधिसूचनेनुसार, संबंधित 16 एफडीसी औषधांचे उत्पादन, विक्री, वितरण आणि पुरवठा देशभरात तात्काळ प्रभावाने प्रतिबंधित करण्यात आला आहे.
सर्व राज्य औषध नियंत्रक, नियामक प्राधिकरणे आणि अंमलबजावणी संस्थांना अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी आणि पालन सुनिश्चित करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. उत्पादक, आयातदार, वितरक आणि इतर संबंधित घटकांनाही कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यासाठी आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
त्यासंबंधीचे ई-राजपत्र या लिंकवर पाहता येईल: https://egazette.gov.in/WriteReadData/2026/273649.pdf
बंदी घालण्यात आलेल्या 16 निश्चित मात्रांच्या संयुक्त औषधांची सविस्तर यादी खाली दिलेली आहे:
|
S.No.
|
Composition of the FDC
|
Recommendations
|
|
1
|
Acetyl Salicylic acid + Ethoheptazine
|
Recommended for prohibition under Section 26A of Drugs & Cosmetics Act, 1940
|
|
2
|
Aloe Extract + Allantoin + Alphatocopherol Acetate +D-Penthenol + Vitamin A
|
|
3
|
Aloe Extract +Vitamin E + Dimethicone + Glycerine
|
|
4
|
Aloe Vera +Jojoba Oil +Vitamin E
|
|
5
|
Aloe vera + Orange oil
|
|
6
|
Aloe vera + Jojoba oil + Wheat germ oil + Tea tree oil
|
|
7
|
Aloe vera + Vitamin E + Herbal
|
|
8
|
Dicyclomine + Paracetamol + Clidinium Bromide
|
|
9
|
Dicyclomine +Paracetamol + Clidinium Bromide + Chlordiazepoxide
|
|
10
|
Gliclazide + Chromium Picolinate
|
|
11
|
Paracetamol + Lignocaine
|
|
12
|
Amoxicillin + Serratiopeptidase+ Lactobacillus Sporogenes
|
|
13
|
Amoxicillin + Cloxacillin + Lactic acid bacillus + Serratiopeptidase
|
|
14
|
Amoxicillin + Serratiopeptidase
|
|
15
|
Cefadroxyl + Probenecid
|
|
16
|
Cefuroxime + Serratiopeptidase
|
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2275631)
आगंतुक पटल : 16