पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारतात सेंट गोबेन कंपनीच्या विस्ताराबाबत कंपनीचे अध्यक्ष बेनॉवा बॅझिन यांच्याशी केली चर्चा
Posted On:
18 JUN 2026 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2026
सेंट गोबेन कंपनीचे अध्यक्ष बेनॉवा बॅझिन यांच्याशी संवाद साधल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
भारतातील पायाभूत सुविधा आणि शहरी विकासामध्ये अभूतपूर्व परिवर्तन होताना दिसत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की या भेटीदरम्यान झालेली चर्चा सेंट गोबेन कंपनीच्या भारतात आणखी विस्तार करण्याबाबत तसेच नवोन्मेष, चक्रीय अर्थव्यवस्था आणि इतर क्षेत्रांमध्ये भागीदारी करण्यासाठी मार्ग शोधण्याबाबत होती.
पंतप्रधान म्हणाले की, भारतातील वैविध्य आणि व्याप्ती, ग्लोबल साऊथ देशांसाठी रचनात्मक उपाययोजना विकसित करण्यासाठीचा एक आदर्श मंच उपलब्ध करून देतात.
पंतप्रधान एक्सवरील संदेशात म्हणतात;
“सेंट गोबेनचे बेनॉवा बॅझिन यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. भारतातील पायाभूत सुविधा आणि शहरी विकासामध्ये अभूतपूर्व परिवर्तन होताना दिसत आहे. सेंट गोबेन कंपनीचा भारतात आणखी विस्तार करण्याच्या तसेच नवोन्मेष, चक्रीय अर्थव्यवस्था आणि इतर क्षेत्रांतील भागीदारी करण्याच्या विविध मार्गांबाबत आम्ही चर्चा केली. भारतातील वैविध्य आणि व्याप्ती, ग्लोबल साऊथ देशांसाठी रचनात्मक उपाययोजना विकसित करण्यासाठीचा एक आदर्श मंच उपलब्ध करून देतात.
@saintgobain”
सोनाली काकडे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2274923)
अभ्यागत कक्ष : 30
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam