माहितीपट हे एक प्रकारच्या सुखद अपघातांच्या मालिकेसारखे असतात. चित्रपटाच्या माध्यमातून आठवणींचे जतन करण्याच्या कलेबद्दल 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तज्ञांनी केली चर्चा
माहितीपट हे भावी पिढ्यांसाठी इतिहास, संस्कृती आणि मानवी अनुभवाचे जतन संवर्धन करतात
मुंबई, 17 जून 2026
19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) भारतीय माहितीपट निर्माता संघटनेने (IDPA) माणसे, क्षण आणि आठवणींचे संकलन करण्याचे माध्यम म्हणून माहितीपट (Documentary as a Means of Archiving Men, Moments and Memories) या विषयावर एका खुल्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. इतिहास, संस्कृती आणि सामूहिक आठवणी जतन करण्याच्या प्रक्रियेत माहितीपटांच्या भूमिकेबद्दलची चर्चा या खुल्या सत्रात केली गेली. त्यानिमित्ताने चित्रपटकर्मी सुरेश शर्मा, संजित नार्वेकर, रूपा बरुआ, अमरीश रॉय चौधरी आणि रेडिओ निवेदक युनूस खान एकाच व्यासपीठावर आले होते.
या सर्व वक्त्यांनी माहितीपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दलचे आपले विचार मांडले. माहितीपटांमध्ये केवळ घटना आणि व्यक्तींची नोंद ठेवली जात नाहीत, तर ते सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अनुभवांचे महत्त्वाचे संकलन म्हणून उपयुक्त असतात, ही बाब सर्व वक्त्यांनी अधोरेखित केली.

या चर्चेदरम्यान सुरेश शर्मा यांनी माहितीपट निर्मिती प्रक्रियेत संशोधन, तथ्यांची पडताळणी आणि सकस कथात्मक मांडणीच्या महत्त्व अधोरेखित केले. माहितीपट जेव्हा त्या त्या विषयातील संघर्ष आणि संवेदनशीलता टिपतात, तेव्हाच ते संस्मरणीय ठरतात, असे त्यांनी सांगितले. संशोधनादरम्यान हाती लागलेले नवीन शोध अनेकदा चित्रपटाच्या कथेला एक नवीन आयाम मिळवून देतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
माहितीपट हे एक प्रकारच्या सुखद अपघातांच्या मालिकेसारखे असतात अशी माहितीपटाची अभिनव व्याख्या संजित नार्वेकर यांनी या चर्चेत मांडली. माहितीपट साकारताना एका कथेचा शोध अनेकदा अनपेक्षित शोधांकडे घेऊन जातो. नवीन निष्कर्षांच्या आधारे नवीन दृष्टिकोनाचा शोध घेण्याची आणि कथांमध्ये बदल करण्याची गरजही असते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

माणसे आणि ठिकाणांच्या कथा मांडण्यासाठी बनवलेले चित्रपट काळाच्या ओघात मौल्यवान ऐतिहासिक संकलन कसे बनतात, याबद्दलचा अनुभव रूपा बरुआ यांनी सामायिक केला. त्यांच्या रायडर्स ऑफ द मिस्ट (Riders of the Mist) आणि दौहित्रीज ऑफ द पोलो गॉड (Daughters of the Polo God) या चित्रपटांचा संदर्भ यानिमित्ताने दिला. आपल्या मते मांडतांना त्यांनी कथात्मक मांडणी आणि त्यासाठीची योग्य गती याद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.
युनूस खान यांनी सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रक्रियेमधली रेडिओ माहितीपटांची भूमिका अधोरेखित केली. कलाकारांची वाटचाल जतन करण्यात आणि देशभरातील लोकसंगीत, साहित्य तसेच इतर सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यात विविध भारतीने केलेल्या प्रयत्नांविषयी देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले.
अमरीश रॉय चौधरी यांनी माहितीपट निर्मितीसाठी ऐतिहासिक संकलनांच्या (आर्काइव्हल) उपयोगाने संशोधन करणे किती महत्वाचे असते याविषयी सांगितले. या संदर्भात त्यांनी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) यांसारख्या संस्थांचे मूल्यही अधोरेखित केले. ऐतिहासिक विषयांचे दस्तऐवजीकरण करताना तथ्यांची अचूकता आणि काळजीपूर्वक पडताळणी करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
एका कथेचा शोध म्हणून सुरू झालेला प्रवास अनेकदा संस्कृती, आठवणी आणि सामाजिक बदलांचे एक महत्त्वाचे संकलन म्हणून कशा रितीने विकसित होत जातो, ही बाब सर्व वक्त्यांनी अधोरेखित केली. माहितीपटांच्या माध्यमातून आठवणी, परंपरा आणि प्रत्यक्ष जगलेले अनुभव टिपले जात असल्याने, माहितीपट ही निव्वळ लिखित नोंदींच्या पलीकडे जात इतिहासाचे कशा रितीने जतन करता येऊ शकते याची सुनिश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरत असतात असेही त्यांनी सांगितले. माहितीपटांसाठीचे संशोधन, संग्रहणाच्या पद्धती तसेच चित्रपटांच्या माध्यमातून आठवणी जतन करण्याचे महत्त्व याबद्दल प्रेक्षकांना अंतर्मुख करणाऱ्या संवादाने या सत्राचा समारोप झाला.
19व्या मिफ विषयी
19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.
- या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या.
- महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते.
- जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
- चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.
प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026! कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274308
| Visitor Counter:
6