MIFF banner

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ्फ) तिसऱ्या दिवशी मास्टरक्लास, ओपन फोरम आणि कार्यशाळांचे आयोजन

मुंबई, 17 जून 2026

मुंबईत आयोजित 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2026 च्या तिसऱ्या दिवशी कल्पना, तांत्रिक नैपुण्य आणि कलात्मक तत्वज्ञानाची उत्साही देवाणघेवाण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील नामवंत चित्रपट निर्माते, नाट्य दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांनी, खास आयोजित करण्यात आलेल्या 'मास्टरक्लासेस', 'ओपन फोरम्स' आणि सादरीकरणावर आधारित कार्यशाळांच्या माध्यमातून चित्रपटप्रेमींशी संवाद साधला.

फ्रेंच रंगभूमीवरील प्रख्यात दिग्दर्शक फॅब्रिस कॅरी यांचा रंगभूमी आणि माहितीपट याच्यातील आंतर-संबंधांचा शोध घेणारा प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा मास्टरक्लास, अभिलेखागार साधने म्हणून माहितीपटांवरील एक अभ्यासपूर्ण आयडीपीए ओपन फोरम सत्र, आणि पुरस्कार-विजेत्या सिनेमॅटोग्राफर सिनेमॅटोग्राफर मधुरा पालित यांच्या मार्गदर्शनाखालील सिनेमॅटोग्राफीवरील माहितीपूर्ण कार्यशाळा, ही आजच्या दिवसाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली.

सत्र 01

मास्टरक्लास: 'स्टॅनिस्लावस्की अँड द सर्च फॉर ह्यूमन ट्रुथ: फ्रॉम थिएटर टू डॉक्युमेंटरी सिनेमा'

फ्रेंच रंगभूमीवरील ख्यातनाम दिग्दर्शक आणि सर्जनशील कलाकार फॅब्रिस कॅरी, 17 जून 2026 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2026 मध्ये 'स्टॅनिस्लावस्की अँड द सर्च फॉर ह्युमन ट्रुथ: फ्रॉम थिएटर टू डॉक्युमेंटरी सिनेमा' या विषयावर मास्टरक्लास घेताना

सत्र 02

ओपन फोरम: माहितीपट, व्यक्ती, क्षण आणि आठवणींचे जतन करण्याचे एक साधन 

17 जून 2026 रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2026 मध्ये आयडीपीए मुक्त चर्चा सत्रात 'व्यक्ती, क्षण आणि आठवणी जतन करण्याचे साधन म्हणून माहितीपट' या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चासत्रात सुरेश शर्मा, रूपा बरुआ, युनूस खान आणि अंबोरीश रॉयचौधरी हे पॅनल सदस्य सहभागी झाले होते. या सत्राचे संचालन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक संजीत नार्वेकर यांनी केले.

सत्र 03

कार्यशाळा: मूलभूत कला आणि दृश्य भाषा: छायाचित्रणाचा आत्मा

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2026 मध्ये 17 जून 2026 रोजी ‘मूलभूत कला आणि दृश्य भाषा: छायाचित्रणाचा आत्मा’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रसिद्ध छायाचित्रकार मधुरा पालित यांनी मार्गदर्शन केले. 

19व्या मिफ विषयी

19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा  माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026!  कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.

रिलीज़ आईडी: 2274301   |   Visitor Counter: 7