पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी मध्यमवर्गीयांचे जीवन सुलभ करण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न केले अधोरेखित

प्रविष्टि तिथि: 15 JUN 2026 2:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जून 2026

 

पंतप्रधानांनी मध्यमवर्गीयांचे जीवन सुलभ करण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न अधोरेखित केले असून मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणे, ही सरकारसाठी विशेष आनंदाची बाब असल्याचे म्हटले आहे. राष्ट्र उभारणीत मध्यम वर्गाचे अगणित प्रकारे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. 

गेल्या दशकभरात सामान्यजनांचे  जीवनमान उंचावण्यावर प्रशासनाचा वाढता भर राहिला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. संधींची सुलभ उपलब्धता, उत्तम पायाभूत सुविधा, सुधारित सार्वजनिक सेवा, किफायतशीर आरोग्यसेवा, दर्जेदार शिक्षण, स्वच्छ शहरे आणि दैनंदिन जीवनातील ताण कमी व्हावा,  या उद्देशाने सरकारचे प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

एक्स (X) वरील लागोपाठच्या पोस्ट्समध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की;

''मध्यमवर्गासाठी सरकार.... 

आपल्या मध्यमवर्गीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणे, ही रालोआ सरकारसाठी विशेष आनंदाची बाब आहे. देशातल्या मध्यम वर्गाने राष्ट्र उभारणीसाठी अगणित प्रकारे योगदान दिले आहे. 

गेल्या दशकभरात सामान्यजनांचे जीवनमान उंचावण्यावर प्रशासनाचा वाढता भर राहिला आहे. संधींची सुलभ उपलब्धता, उत्तम पायाभूत सुविधा, सुधारित सार्वजनिक सेवा, किफायतशीर आरोग्यसेवा, दर्जेदार शिक्षण, स्वच्छ शहरे आणि दैनंदिन जीवनातील ताण कमी व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 

#12YearsOfSakshamMiddleClass”

 

''मध्यमवर्गीयांची जीवनमान सुलभता कशी वृद्धिंगत केली जात आहे, याची एक झलक. 

#12YearsOfSakshamMiddleClass”

 

* * *

आशिष सांगळे/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2272921) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam