पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी थिरू भारतीराजा यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

Posted On: 11 JUN 2026 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक थिरू भारतीराजा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, थिरू भारतीराजा हे चित्रपटसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांच्या कलाकृतींनी तमिळ चित्रपटसृष्टीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले.

विशेषतः ग्रामीण जीवनाचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.या दुःखद प्रसंगी आपल्या भावना त्यांच्या कुटुंबीयांसोबत तसेच त्यांच्या असंख्य चाहत्यांसोबत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी दिवंगत आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली.

‘एक्स’वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी सांगितले :

“थिरू भारतीराजा यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले. चित्रपटसृष्टीतील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कलाकृतींनी तमिळ चित्रपटसृष्टीला नवे रूप दिले. विशेषतः ग्रामीण जीवनाचे त्यांनी केलेले चित्रण अत्यंत उल्लेखनीय होते. या दुःखद क्षणी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि असंख्य चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती.”

 

* * *

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2271647) अभ्यागत कक्ष : 52