उपराष्ट्रपती कार्यालय
भारताचे सर्वाधिक काळ सलगपणे कार्यरत राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
10 JUN 2026 10:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2026
भारताचे सर्वाधिक काळ सलगपणे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
समाज माध्यमावरील एका संदेशात उपराष्ट्रपतींनी या यशाचे वर्णन पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील भारताच्या विकास प्रवासातील एका परिवर्तनशील पर्वाचे द्योतक असलेला ऐतिहासिक टप्पा असे केले.
त्यांनी नमूद केले की भारताने आर्थिक विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक सक्षमीकरण आणि तांत्रिक प्रगती यासह प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांनी पुढे असेही निरीक्षण नोंदवले की, भारताची वाढलेली जागतिक प्रतिष्ठा आणि नव्याने निर्माण झालेला सांस्कृतिक आत्मविश्वास ही या काळाची निर्णायक वैशिष्ट्ये म्हणून उदयास आली आहेत.
सर्वसमावेशक विकासाप्रति पंतप्रधानांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकत सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले की, 25 कोटींहून अधिक लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढण्यात आले असून लाखो कुटुंबांना आशा, संधी आणि सन्मान मिळाला आहे.
उपराष्ट्रपतींनी भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि नागरी वारसा जतन व संवर्धन करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, विस्मृतीत गेलेल्या वीरांचा सन्मान करून, भारताच्या विविध परंपरा आणि भाषांचा गौरव करून, सांस्कृतिक वारसा जतन करून आणि वसाहतवादी मानसिकता झुगारून पंतप्रधानांनी राष्ट्रीय अभिमान आणि नागरी जाणीव अधिक दृढ केली आहे.
उपराष्ट्रपतींनी भारताची सभ्यताविषयक एकता आणि सांस्कृतिक वारसा दृढ करण्यासाठी पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांवर अधिक प्रकाश टाकला, ज्यामध्ये काशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम, नवीन संसद भवनात पवित्र सेंगोलची स्थापना, चोल वारशाचा सन्मान करण्यासाठी गंगैकोंडा चोलपुरम येथील त्यांची भेट आणि परदेशातून अमूल्य कलावस्तू व पुरातन वस्तू परत आणणे यांचा समावेश आहे.
उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांना अविरत राष्ट्रसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
* * *
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2271408)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam