गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रथमच गरिबांचे कल्याण आणि अभूतपूर्व विकास समांतर दिशेने होत असताना आपण अनुभवत आहोत: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह


पंतप्रधान मोदींनी गेल्या 12 वर्षांत एकही दिवसाची सुट्टी न घेता राष्ट्र आणि नागरिकांची अविरतपणे सेवा केली आहे

जेव्हा नेतृत्वाचा उद्देश स्पष्ट असतो, राष्ट्रीय हित हेच त्यांचे ध्येय असून ते त्याला पूर्णपणे समर्पित असतात, तेव्हाच अशा प्रकारचे परिवर्तन शक्य होते

Posted On: 09 JUN 2026 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या 12 वर्षांत, पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकास या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे; असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज केले.

“आजच्या दिवशी 12 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदीजींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली, या 12 वर्षांत देशाने प्रथमच गरीबांचे कल्याण आणि अभूतपूर्व विकास समांतर दिशेने होताना अनुभवला आहे, असे ‘एक्स’वरील एका पोस्टवर अमित शाह यांनी म्हटले आहे. “80 कोटी लोकांना मोफत रेशन देणे असो, देशभरात 98 हून अधिक विमानतळे बांधणे असो, 140 हून अधिक वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करणे असो; 4 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना पक्की घरे देणे किंवा 1.45 लाख किलोमीटरचे रस्ते आणि 3,000 किलोमीटरहून अधिक आधुनिक द्रुतगती मार्ग बांधणे असो; 50 कोटी लोकांना 5 लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण आणि 10 कोटींहून अधिक कुटुंबांना एलपीजी जोडण्या देणे असो, किंवा भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनवणे असो, मोदीजींनी या 12 वर्षांत एकही दिवस सुट्टी न घेता राष्ट्र आणि नागरिकांची अविरतपणे सेवा केली आहे. जेव्हा नेतृत्वाचा उद्देश स्पष्ट असतो, राष्ट्रीय हित हेच त्यांचे ध्येय असून ते त्याला पूर्णपणे समर्पित असतात, तेव्हाच अशा प्रकारचे परिवर्तन शक्य होते, असे अमित शहा यांनी पुढे नमूद केले आहे.

नितीन फुल्लुके /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2270800) अभ्यागत कक्ष : 62