पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषद


खत उत्पादनासाठीच्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेचा नियमित आढावा घेतला जात आहे, चालू खरीप हंगामासाठी खतांच्या उपलब्धतेच्या बाबतीत कोणतेही मोठे आव्हान नाही

2026 च्या खरीप हंगामासाठी 383.9 लाख मेट्रिक टन इतक्या प्रमाणात खतांची गरज भासू शकते असा नवा अंदाज, आजमितीला गरजेच्या तुलनेत 51% पेक्षा जास्त साठा उपलब्ध, हे प्रमाण 33% इतक्या सर्वसाधारण उपलब्धता पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त

E85 ची किंमत पेट्रोलपेक्षा जवळपास 20 रुपये प्रति लीटरने कमी, स्वच्छ आणि अधिक किफायतशीर दरातील हरित दळणवळणाचा पर्याय

MT MARIVEX या जहाजावर आग लागल्याची नोद, जहाजावरील सर्व 24 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती

जहाजबांधणी महासंचालनालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय नौदलाकडून भारतीय खलाशांना आवश्यक त्या मदतीचा पुरवठा

प्रविष्टि तिथि: 08 JUN 2026 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2026

पश्चिम आशियातील सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार नियमितपणे अद्ययावत माहिती प्रसारीत करून, सातत्यपूर्णतेने नागरिकांपर्यंत माहिती पोहचवण्याचे प्रयत्न करत आहे.

खतांचा साठा आणि उपलब्धता

देशातील खतांचा एकंदरीत साठा समाधानकारक आणि दिलासादायक स्थितीत आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने केलेल्या पुनर्मुल्यांकनानुसार 2026 च्या खरीप हंगामासाठी 383.9 लाख मेट्रिक टन इतक्या प्रमाणात खतांची गरज असणार आहे. या गरजेच्या तुलनेत आजच्या घडीला जवळपास 197.56 लाख मेट्रिक टने (51% पेक्षा जास्त) साठा उपलब्ध आहे. हा साठा सुमारे 33% इतक्या सर्वासाधारण पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. यातून केंद्र सरकारचे सुधारित नियोजन, आगाऊ साठा करणे आणि कार्यक्षम रसद पुरवठा आणि व्यवस्थापन दिसून येते.

देशातील शेतकऱ्यांनी चालू खरीप 2026 च्या हंगामात 07.06.2026 पर्यंत एकूण 86.65 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची खरेदी यापूर्वीच करून ठेवली आहे. हे प्रमाण एकूण गरजेच्या प्रमाणाच्या तुलनेत अंदाजे 22.57% इतके आहे.

युद्धाची परिस्थिती उद्भवल्यानंतर देशातील शेतकऱ्यांनी 11.17 लाख मेट्रिक टन सेंद्रिय खतांची (FOM/LFOM/PROM) खरेदी केली आहे (पंजाब 2.83 लाख मेट्रिक टन, उत्तर प्रदेश 2.71 लाख मेट्रिक टन, हरियाणा 1.33 लाख मेट्रिक टन, मध्य प्रदेश 1.25 लाख मेट्रिक टन, गुजरात 0.96 लाख मेट्रिक टन, महाराष्ट्र 0.84 लाख मेट्रिक टन). गेल्या वर्षी याच कालावधीतील 3.20 लाख मेट्रिक टन इतकी खरेदी झाली होती, त्या तुलनेत यंदाच्या खरेदीचे प्रमाण जास्त आहे. खरेदीमध्ये झालेल्या या लक्षणीय वाढीतून सेंद्रिय पोषण स्रोतांचा अंगिकर करण्याचा सकारात्मक कल दिसून येतो, तसेच हळहळू शेतकरी रासायनिक खतांच्याऐवजी सेंद्रिय पर्याय वापरण्याला पसंती देऊ लागल्याचा कलही यातून दिसून येतो.

सध्या, चालू खरीप हंगामासाठी खतांच्या उपलब्धतेच्या संदर्भात कोणतेही मोठे आव्हान समोर नाही.

सध्याची संकटसदृश्य परिस्थिती उद्भवल्यानंतर खतांचे देशांतर्गत उत्पादन आणि आयात - (लाख टनामध्ये)

उत्पादन

सध्याची संकटसदृश्य परिस्थिती उद्भवल्यानंतरचे देशांतर्गत उत्पादन

सध्याची संकटसदृश्य परिस्थिती उद्भवल्यानंतर भारतीय बंदरांवर पोहोचलेली आयात

युरिया

69.15

18.35

डीएपी

9.78

2.53

एनपीके

22.13

7.87

एसएसपी

13.14

0

एमओपी

0

4.45

एकूण

114.20

33.20

टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आयात तसेच देशांतर्गत उत्पादनाद्वारे एकूण सुमारे 147.40 लाख मेट्रिक टन (एलएमटी) खतांचा अतिरिक्त पुरवठा करण्यात आला आहे.

विद्यमान जून महिन्यात भारतीय बंदरांवर 25 एलएमटी पेक्षा जास्त आयात केलेले युरिया,डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि नायट्रोजन-फॉस्फरस-पोटॅशिय  (एनपीके)  पोहोचण्याची अपेक्षा आहे.

भारताने 17 एलएमटी  युरिया खरेदीसाठी आणखी एक जागतिक निविदा जारी केली असून त्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

खत उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची, म्हणजेच युरिया आणि फॉस्फरस-पोटॅशियम (पी अँड के)  खतांच्या निविष्ठांची  उपलब्धता, खत विभागाकडून  नियमितपणे तपासली जात आहे.

कंपन्यांनी सादर केलेली सर्व अनुदान देयके(सबसिडी बिले खत विभागाकडून  दर आठवड्याला नियमितपणे भरली जात असून, सध्या खत अनुदानासाठी  पुरेसा निधी उपलब्ध आहे.

खतांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आतापर्यंत अधिकारप्राप्त सचिवांच्या गटाच्या (ईजीओएस- एम्पाॅवर्ड ग्रुप ऑफ सेक्रेटरीज) 11 बैठका झाल्या असून, उपलब्धतेमधील बहुतेक आव्हाने ईजीओएस (EGoS) द्वारे सोडवण्यात आली आहेत.

भारताची खत सुरक्षा मजबूत, स्थिर आणि सुव्यवस्थित असून, सर्व प्रमुख खतांची उपलब्धता गरजेपेक्षा सातत्याने जास्त आहे.

ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता:

सार्वजनिक सूचना आणि नागरिक जागरूकता:

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी  ची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी पेट्रोल, डिझेलची भीतीपोटी अतिरिक्त खरेदी  आणि एलपीजी सिलिंडर्सची  आगाऊ नोंदणी करणे टाळावे.

अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहा.

नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी पीएनजी, इंडक्शन/इलेक्ट्रिक कुकटॉप्स यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करावा.

घाऊक आणि औद्योगिक ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी केवळ अधिकृत खरेदी माध्यमांतूनच डिझेलची खरेदी करावी.

अंमलबजावणी आणि देखरेख कार्यवाही:

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी ची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून देशभरात अंमलबजावणीची कार्यवाही सुरू आहे.

एलपीजी  संबंधित कारवाई: एलपीजी सिलिंडरची साठेबाजी आणि काळाबाजार तपासण्यासाठी गेल्या 4 दिवसांत 7 प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर)  नोंदवण्यात आले असून 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

पेट्रोल, डिझेल संबंधित कारवाई: गेल्या 4 दिवसांत देशभरात 1800 पेक्षा जास्त छापे  टाकण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या  अधिकाऱ्यांकडून अचानक तपासणी देखील सुरू आहे.

एलपीजी वितरक – गेल्या 4 दिवसांत सुमारे 890 एलपीजी वितरकांची तपासणी करण्यात आली आहे. याशिवाय 105 एलपीजी वितरकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

किरकोळ विक्री केंद्रे – गेल्या 4 दिवसांत सुमारे 2400 किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. 22 किरकोळ दुकानांना दंड ठोठावण्यात आला असून, 554 किरकोळ दुकानांचे कामकाज निलंबित करण्यात आले आहे.

एलपीजी पुरवठा

देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याची स्थिती :

उद्योग क्षेत्राच्या तुलनेत काल ऑनलाइन एलपीजी सिलिंडर बुकिंगमध्ये सुमारे 99% वाढ झाली आहे.

वितरक स्तरावर होणारा गैरवापर टाळण्यासाठी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (डीएसी) आधारित डिलिव्हरीमध्ये सुमारे 96% वाढ करण्यात आली आहे. डीएसी ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर प्राप्त होतो.

गेल्या 4 दिवसांत सुमारे 1.77 कोटी एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगपैकी जवळपास 1.67 कोटी सिलिंडर वितरित करण्यात आले.

व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना:

गेल्या 4 दिवसांत 5 किलो वजनाचे सुमारे 1.89 लाख एफटीएल सिलिंडर विकले गेले.

नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तार उपक्रम

मार्च 2026 पासून, सुमारे 9.16  लाख पीएनजी जोडण्यांना गॅस पुरवठा  करण्यात आला आहे आणि अतिरिक्त 3.05 लाख जोडण्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे एकूण जोडण्यांची संख्या 12.21 लाख झाली आहे. याशिवाय, नवीन जोडण्यांसाठी सुमारे 9.24 लाख ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे.

07.06.2026 पर्यंत 82,000 पेक्षा जास्त पीएनजी ग्राहकांनी MYPNGD.in संकेतस्थळाद्वारे आपल्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.

किरकोळ इंधन उपलब्धता आणि किंमत उपाययोजना

देशभरातील पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेलचे पुरेसे साठे उपलब्ध आहेत.

फ्लेक्स इंधन

फ्लेक्स इंधन वाहन 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री यांनी 03.06.2026 रोजी हीरो मोटोकॉर्प 2 फ्लेक्स-फ्यूएल मोटरसायकल आणि 04.06.2026 रोजी मारुती सुझुकीची फ्लेक्स-इंधन वॅगनआर कार लॉन्च केली.

ई-85 इंधन

· केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी 05.06.2026 रोजी ई-85 इंधनाचे लोकार्पण केले.

· ई-85 हे उच्च-इथेनॉल मिश्रित इंधन असून त्यात 80-85% इथेनॉल आणि 14-19% पेट्रोल असते. हे इंधन BIS 16634:2023 मानकांनुसार विशेषत्वाने फ्लेक्स-फ्यूएल वाहनांमध्ये वापरण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

· ई-85 इंधन केवळ विशेष तयार केलेल्या फ्लेक्स-फ्यूएल वाहनांसाठी आहे, सामान्य पेट्रोल वाहनांसाठी नाही.

· ई-85 इंधनाची किंमत पारंपरिक ई-20 पेट्रोलपेक्षा प्रति लिटर सुमारे 20 रुपयांनी कमी आहे.

· ई-85 वर चालणारी फ्लेक्स-फ्यूएल वाहने, पारंपरिक पेट्रोल वाहनांच्या तुलनेत त्यांच्या पूर्ण जीवनचक्रातील हरितगृह वायू उत्सर्जन सुमारे 61% नी कमी करू शकतात.

सागरी सुरक्षा आणि नौवहन कार्यप्रणाली

· ओमानच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी अंदाजे 13:30 वाजता एमटी मारिव्हेक्स (MT MARIVEX) या जहाजावर आग लागल्याची घटना घडली. जहाजावर 24 भारतीय खलाशी असून, ते सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, जहाज वाहतूक महासंचालनालयामार्फत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय खलाशांना आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास आणि भारतीय नौदल यांच्याशी समन्वय साधत आहे.

· डीजी शिपिंग नियंत्रण कक्षाची ताजी माहिती : नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाल्यापासून 12,020 दूरध्वनी कॉल्स आणि 26,832 हून अधिक ईमेल्स हाताळण्यात आले आहेत.

· भारतीय खलाशांविषयी  मायदेशी परतण्याबाबत माहिती : नौवहन महासंचालनालयामार्फत (डीजी शिपिंग), मंत्रालयाने आतापर्यंत 3,506 हून अधिक भारतीय खलाशांच्या सुरक्षित स्वदेशी परतण्याची सोय केली आहे. यात गेल्या 96 तासांत आखाती प्रदेशातील विविध ठिकाणांहून भारतात परत आलेल्या 32 खलाशांचा समावेश आहे. 

सुषमा काणे/तुषार पवार/आशुतोष सावे/भक्ती सोनटक्के/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2270493) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Kannada , Malayalam