गृह मंत्रालय
गरिब कल्याणाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह
गेल्या 12 वर्षांत गरिबांसाठी हाती घेतलेल्या कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून सरकारने कोट्यवधी नागरिकांना बँकिंग सुविधा, आर्थिक सुरक्षितता आणि स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडून घेतले आहे
देशातील गरीब वर्गाला आर्थिक मुख्यप्रवाहात समाविष्ट करून, ‘विकसित भारता’साठी एक मजबूत पाया उभारला जात आहे
Posted On:
08 JUN 2026 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, गरिब कल्याणाला (गरिबांसाठीचे कल्याणकारी उपक्रम) मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ते म्हणाले की गेल्या 12 वर्षांत गरिबांसाठी हाती घेतलेल्या कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून सरकारने अन्नधान्य योजना, पंतप्रधान आवास योजना तसेच जन-धन यांसारख्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना बँकिंग सुविधा, आर्थिक सुरक्षितता आणि स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडून घेतले आहे.
एक्स मंचावरील संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “गरिब कल्याणाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. #12YearsOfGaribKalyan मध्ये सरकारने अन्न योजना, पंतप्रधान आवास तसेच जन-धन यांसारख्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना बँकिंग सुविधा, आर्थिक सुरक्षितता आणि स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडून घेतले आहे. देशातील गरीब वर्गाला अगदी मुलभूत पायाभूत सुविधा, सामाजिक सुरक्षितता आणि अधिक चांगले जीवनमान यांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक मुख्यप्रवाहात समाविष्ट करून, ‘विकसित भारता’साठी एक मजबूत पाया उभारला जात आहे.”
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2270410)
अभ्यागत कक्ष : 59
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam