पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून भारतीय महिला फुटबॉल संघाचे सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 विजेतेपदाबद्दल अभिनंदन
Posted On:
07 JUN 2026 1:58PM by PIB Mumbai
सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये विजेतेपद मिळविल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा फुटबॉल खेळाकडे आकर्षित होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच संघाच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशात सांगितले :
“सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 जिंकल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा फुटबॉल खेळण्यासाठी प्रेरित होतील. संघाच्या भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
***
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2270017)
अभ्यागत कक्ष : 77
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada