पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2026 6:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक पार पडली. भारताचे आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासाच्या प्राधान्यक्रमांशी संबंधित विविध विषयांवर या बैठकीत विचारमंथन करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले .
सुधारणांच्या प्रवासाला अधिक गती देण्याबरोबरच ‘जीवनमान सुकर होणे’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ सुनिश्चित करण्याबाबतही दृष्टिकोन मांडण्यात आल्याचे मोदींनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हणतात:
"पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. भारताचे आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासाच्या प्राधान्यक्रमांशी संबंधित विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच, सुधारणांच्या प्रवासाला अधिक गती देण्याबरोबरच ‘सुकर जीवनमान’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ सुनिश्चित करण्यावरही दृष्टिकोन मांडण्यात आले.
@EACtoPM"
***
माधुरी पांगे/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269852)
आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam