युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
“भारतातील युवावर्ग ही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असून ‘विकसित भारत’चे स्वप्न साकारण्यात या युवाशक्तीला केंद्रस्थान”: केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडवीय
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2026 4:15PM by PIB Mumbai
केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासमवेत आज राजधानीतील त्यागराज क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या ‘युथ फॉर विकसित भारत: माय भारत युथ कन्व्हेन्शन’ला संबोधित केले.

या संमेलनात देशभरातील 6,000 हून अधिक तरुणांना एकत्र आणले गेले, त्यामध्ये विद्यार्थी, तरुण व्यावसायिक, तरुण महिला, उद्योजक, कंटेंट क्रिएटर, नवोन्मेषक, उदयोन्मुख नेते आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारे यशवंत अशी वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा समावेश होता.
या संमेलनात आमदार आणि गायिका मैथिली ठाकूर, अभिनेते विक्रांत मेस्सी, उद्योजक अमन गुप्ता आणि भारतीय क्रिकेटपटू जितेश शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांनी 'माय भारत एनएसएस'च्या स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना आपले अनुभव कथन केले, तसेच त्यांनी तरुणांना उत्कृष्टतेची कास धरण्यास आणि राष्ट्रीय विकासात अर्थपूर्ण योगदान देण्यास प्रेरित केले.

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मांडवीय यांनी आपल्या भाषणात, भारतातील युवा वर्ग ही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असून 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यात ही युवाशक्तीला केंद्रस्थानी असल्याचे अधोरेखित केले. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 65 टक्के व्यक्ती 35 वर्षांखालील असून, लोकसंख्याशास्त्राच्या दृष्टीने ती देशासाठी जमेची बाजू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. मांडवीय यांनी राष्ट्र उभारणीच्या अनुषंगाने युवकांच्या क्षमतेला वाव देणाऱ्या 'माय भारत'च्या उपक्रमांवर अधिक प्रकाश टाकला. 'माय भारत'ने अलीकडेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले, या कामगिरीचे मंत्रीमहोदयांनी कौतुक करत, या मंचाद्वारे आयोजित केले जाणारे कार्यक्रम, स्वयंसेवेच्या संधी आणि राष्ट्रउभारणीशी उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे तरुणांना आवाहन केले.

या अधिवेशनात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भारताच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्या नामवंत खेळाडूंचा क्रीडा सत्कार करून क्रीडा क्षेत्रातील त्यांचा उत्कृष्टतेचा गौरवही करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत म्हणजे 2047 पर्यंत विकसित, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक भारत घडवण्यासाठी तरुण नागरिकांच्या सक्रिय योगदानाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणाऱ्या 'विकसित भारत संकल्पा'सह 'माय भारत युवा संमेलना'चा समारोप करण्यात आला.


***
माधुरी पांगे/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269822)
आगंतुक पटल : 70
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Khasi
,
हिन्दी
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Urdu
,
Odia
,
Telugu
,
Malayalam