पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भक्कम वाढीची गती अधोरेखित केली

Posted On: 05 JUN 2026 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची गती मजबूत असल्याचे आज अधोरेखित केले. पंतप्रधानांनी नमूद केले की, आर्थिक वर्ष 2025-26 मधील 7.7% आणि आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीतील 7.8% जीडीपी वाढीचा दर हा अर्थव्यवस्थेची अंगभूत ताकद, सुधारणांचे यश आणि 140 कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमाचे द्योतक आहे.

मोदी यांनी प्रतिपादन केले की, ‘जीवन सुलभता’ आणि ‘व्यवसाय सुलभता’ अधिक उत्तम बनवण्याच्या दृष्टीने सरकार कोणतीही कसर सोडणार नाही. तरुणांसाठी संधी वाढाव्यात, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातील, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"भारताच्या विकासाची गती मजबूत आहे!

आर्थिक वर्ष 2025-26 मधील 7.7% आणि आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीतील 7.8% जीडीपी वाढीचा दर हा आपल्या अर्थव्यवस्थेची अंगभूत ताकद, सुधारणांचे यश आणि 140 कोटी भारतीयांच्या कठोर परिश्रमाचे द्योतक आहे.”

आम्ही ‘जीवन सुलभता’, ‘व्यवसाय सुलभता’ यांना अधिक चालना देण्यासाठी आणि आमच्या तरुणांसाठी संधी वाढवण्यात  कोणतीही कसर सोडणार नाही.

 

* * *

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2269608) अभ्यागत कक्ष : 81