संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय वायुसेनेने पोहोचवले भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेष मंगोलियात

प्रविष्टि तिथि: 31 MAY 2026 1:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2026

भारतीय वायुसेनेचे आयएल-76 सामरिक हवाई वाहतूक विमान, ‘गजराज’ ने 30 मे 2026 रोजी भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष दिल्लीहून मंगोलियात पोहोचवले. या विमानाने रात्रभर उड्डाण केले आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार (आयएसटी) 11:25 वाजता मंगोलियात उतरले.

मैत्रीपूर्ण राष्ट्रांशी सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने भारतीय वायुसेनेने हे अभियान पूर्ण केले.

ही हवाई वाहतूक मोहीम राष्ट्रीय उद्दिष्टांना पाठिंबा देण्याची आणि भारताच्या जागतिक सांस्कृतिक संपर्कवृद्धी उपक्रमांमध्ये योगदान देण्याची भारतीय वायुसेनेची क्षमता अधोरेखित करते.


यश राणे/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2267208) आगंतुक पटल : 120
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Gujarati , Tamil , Telugu